Turkey Earthquake  Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Earthquake: तुर्कीच्या भूकंपात मृतांचा आकडा 50 हजारांवर जाऊ शकतो - संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखाने व्यक्त केली भीती

Turkey Earthquake: भूकंपामुळे तुर्की आणि सीरियात शोककळेचं वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Turkey Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपानं जगभरातील लोकांना हादरवून सोडले आहे. या भूकंपात आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवला आहे. इथे मदतकार्य अतिशय वेगानं सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे.

भूकंपामुळं तुर्की( Turkey ) आणि सीरियात शोककळेचं वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी भीती व्यक्त केली आहे. या विनाशकारी भूकंपात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असेल.

प्रत्यक्षात आम्ही मृतांचा आकडा मोजायला सुरुवात केलेली नाही. पण ज्या प्रकारे ढिगारा दिसत आहे, त्यावरून हा आकडा 50 हजारांच्या पुढं जाऊ शकतो.

सध्या आम्ही बचाव कार्य वेगात सुरु केलं असून लोकांची काळजी घेत आहोत,असंही मार्टिन ग्रिफिथ्स यांनी म्हटले आहे. भूकंपातील अधिकृत मृतांची संख्या तुर्कीमध्ये 24,617 आणि सीरियामध्ये 3,574 आहे. हजारो बचाव कर्मचारी ढिगाऱ्यांमध्ये वाचलेल्यांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यात 80 मेगावॅट वीजटंचाई; उद्योगांना भारनियमनाचा धोका, बैठकीतही तोडगा नाही

विकासाचे आकडे वाढले, मग गोमंतकीय सुखी का नाहीत?; निवडणुकीआधी जनतेच्या अपेक्षांचा हिशेब मांडण्याची वेळ

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

SCROLL FOR NEXT