Dalai Lama Dainik Gomantak
ग्लोबल

Dalai Lama Viral Video: दलाई लामांनी मुलाच्या ओठांचे घेतले चुंबन अन् म्हणाले... Video व्हायरल होताच चर्चांना उधाण

सोशल मिडियावर दलाई लामा यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल प्रचंड व्हायरल होतो आहे.

दैनिक गोमन्तक

Dalai Lama Viral Video: दलाई लामा यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडिओमध्ये ते एका लहान मुलाच्या होठांचे चुंबन करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये होठांचे चुंबन घेतल्यानंतर ‘जीभ चोखतोस का’ असे विचारले आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा एक मुलगा आध्यात्मिक नेत्याला सन्मान देण्यासाठी आला असता लामा यांनी ही कृती केली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे.

दलाई लामा (Dalai Lama) लहान मुलाला ओठांवर किस करतानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी दलाई लामा यांनी मुलाला आपली जीभ चोखण्यास सांगितल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांकडुन संताप व्यक्त केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये दलाई लामा अल्पवयीन मुलाला विचारताना ऐकू येत आहे की, तु माझी जीभ चोखतोस का?' या व्हिडिओवर ट्विटर यूजर्संनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडियो शेअर करताना ट्विटर यूझर जोस्ट ब्रोकर्स यांनी लिहिले आहे की, ‘दलाई लामा एका बौद्ध कार्यक्रमात एका भारतीय मुलाचे चुंबन घेत आहेत.

त्याचबरोबर मुलाच्या जीभेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत. @DalaiLama’ यांना टॅग करत अन्य एक ट्विटर युझर्स दीपिका पुष्कर नाथ यांनी लिहिले की, ही कृती अशोभनीय आहे आणि कोणीही दलाई लामा यांच्या कृतीचे समर्थन करणार नाही.

यापूर्वीही दलाई लामा यांनी 2019 मध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले की, माझी उत्तराधिकारी एक महिला होईल व ती दिसायला आकर्षक असली पाहिजे. या विधानामुळे चांगलीच चर्चांना उधाण आले होते.

2019 मध्ये धर्मशाळेतील नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याच्या निर्वासनातून प्रसारित झालेल्या ब्रिटीश ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले होते. नंतर त्यांनी याप्रकरणी माफी मागितली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT