China Corona Update Dainik Gomantak
ग्लोबल

China Corona Update: चीनमध्ये कोरोनाचा कहर! 80 % लोकसंख्या बाधित, हाजारो मृत्यू; यंत्रणा हाय अलर्टवर

चीनमधील निर्बंध शिथिल केल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

China Corona Update: चीनमध्ये कोरोनामुळे दिवसेंदिवस बिकट परिस्थिती होत चालली आहे. चीनच्या आरोग्य विभागाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान चीनमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सुमारे 13,000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोना इतका पसरला आहे की तेथील 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 12 जानेवारीपर्यंत कोरोनामुळे सुमारे 60 हजार लोकांचा मृत्यू झाला. अशी माहिती चीनने आठवडाभरापूर्वी दिली होती. मात्र चीनमधील निर्बंध शिथिल केल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एएफपीच्या माहितीनुसार, चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) एक निवेदन जारी केले आहे. कोरोनामुळे श्वसन प्रणाली निकामी झालेल्या 681 रुग्णांचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

याव्यतिरिक्त 11,977 इतर रुग्णांचाही मृत्यू झाला आहे, ज्यांना विविध आजारांसोबतच कोरोनाही झाला होता. तथापि, या आकडेवारीमध्ये कोरोना झालेल्या आणि घरीच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या समाविष्ट करण्यात आलेली नाही.

चीनच्या ग्रामीण भागात संक्रमण वेगाने वाढण्याची शक्यता आहे, असे काही दिवसांपूर्वी रॉयटर्समध्ये (Reuters) प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे. चिनी नववर्ष अधिकृतपणे 21 जानेवारीपासून सुरू होते याकाळात संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लॉकडाउन विरोधात नोव्हेंबरच्या उत्तरार्धात देशभरात ऐतिहासिक निदर्शने झाल्यानंतर चीनने गेल्या महिन्यात अचानक सर्व निर्बंध उठवले आणि सीमा खुल्या केल्या.

निर्बंधांच्या अचानक उठविल्यामुळे चीनच्या 1.4 अब्ज लोकसंख्येला विषाणूचा धोका निर्माण झाला आहे, त्यापैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त लोक अशा भागात राहतात जिथे संक्रमण आधीच जास्त झाले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीची सर्वात वाईट अवस्था अद्याप संपलेली नाही. आम्ही प्राधान्याने मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित करत आहे. असे चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे माजी मुख्य महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग म्हणाले.

तसेच, ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची देखील हीच योग्य वेळ आहे. ग्रामीण भागात, वैद्यकीय सुविधा तुलनेने कमी आहेत. तसेच, याभागात वृद्ध, आजारी आणि अपंग लोक मोठ्या संख्येने आहेत. असे गुआंग म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT