Covid 19 New Variant Dainik Gomantak
ग्लोबल

Covid 19 New Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा जगात हाहाकार, मानवी पेशींवर करतो अटॅक; संशोधकांचा मोठा खुलासा

Covid 19 New Variant pj 2 1 Global Spread: कोरोनाचा नवा आणि चिंता वाढवणारा 'पीजे. 2. 1' हा नवा व्हेरिएंट सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत असून, त्यामुळे पुन्हा एकदा नव्या महामारीची भीती निर्माण झाली आहे.

Manish Jadhav

Covid 19 New Variant pj 2 1 Global Spread: कोरोनाचा नवा आणि चिंता वाढवणारा 'पीजे. 2. 1' हा नवा व्हेरिएंट सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत असून, त्यामुळे पुन्हा एकदा नव्या महामारीची भीती निर्माण झाली आहे. या नव्या व्हेरिएंटची सुरुवात यंदाच्या मे महिन्यात कॅनडातील ऑन्टारियो येथे झाली. त्यानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, फ्लोरिडासह युरोप, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आशियातील काही भागांमध्ये याचे रुग्ण आढळले.

विशेष म्हणजे, हा विषाणू हळूहळू म्यूटेशन करण्याऐवजी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अनुवांशिक बदल करुन समोर आला, ज्याला 'सॉल्टेशन व्हेरिएंट' असे म्हटले जात आहे.

सध्याच्या संशोधनानुसार, हा नवीन व्हेरिएंट मानवी पेशींच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या 'एसी टू' रिसेप्टरशी अत्यंत प्रभावीपणे जोडला जातो. या वाढलेल्या बाइंडिंग क्षमतेमुळेच हा विषाणू वेगाने पसरत असल्याचा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. या व्हेरिएंटची कोणतीही वेगळी किंवा अत्यंत गंभीर अशी स्वतंत्र लक्षणे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. नेहमीच्या सर्दी, खोकला, हलका किंवा तीव्र ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, सततची थकवा जाणवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखीच याची लक्षणे आहेत. याशिवाय, पूर्वीच्या कोरोना (Corona) संसर्गाप्रमाणेच चव किंवा गंध जाणे तसेच पोटदुखीचा त्रासही काही रुग्णांमध्ये दिसू शकतो.

हा नवीन व्हेरिएंट आधीच्या कोरोनाच्या तुलनेत अधिक घातक किंवा जीवघेणा आहे का, याबद्दल वैज्ञानिक स्तरावर अद्याप कोणतेही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत. हा विषाणू संसर्ग पसरवण्याच्या बाबतीत अधिक वेगाने काम करत असला, तरी त्याची तीव्रता किती गंभीर आहे, याचा अभ्यास सुरु आहे. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वृद्ध व्यक्ती, आधीच इतर गंभीर आजारांनी ग्रासलेले रुग्ण, मधुमेह, हृदयविकार किंवा श्वसनाचे विकार असलेले तसेच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या विषाणूचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घेणे आणि आरोग्याची योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Daily Horoscope: कष्टाचं चीज होण्याचा दिवस! चंद्रदेवाच्या कृपेनं 'या' चार राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; बुधवारी ग्रहांचा शुभ संयोग

टीम इंडियाचा 'मिस्टर 360' आता मुंबईचा कर्णधार! सूर्यकुमार यादव दीर्घ काळानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मैदानात उतरणार

Philippines Plane Crash: फिलिपाईन्समध्ये मोठी दुर्घटना! परदेशी प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश; बचावकार्य सुरू

Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

इफ्फीत चित्रपट तंत्रज्ञानातील नवउद्योजकांना संधी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून वेव्हएक्स स्टार्टअप दालनासाठी अर्ज आमंत्रित

SCROLL FOR NEXT