Wuhan Lab Dainik Gomantak
ग्लोबल

Covid19: चीनच्या लॅबमधूनच कोरोना लिक! US रिपब्लिकनचा अहवाल

वस्तुस्थिती देखील सूचित करते की व्हायरस वुहानच्या लॅब मधून लीक झाला असून 12 सप्टेंबर 2019 पूर्वी कधीतरी झाला असेल.

दैनिक गोमन्तक

अमेरिकन रिपब्लिकनने (US Republicans) सोमवारी जारी केलेल्या अहवालात दावा करण्यात आला आहे की कोविड -19 महामारीला (US Republicans) जन्म देणाऱ्या कोरोनाव्हायरसचे मूळ केंद्र चीनच्या (China) वुहान लॅब (Wuhan Lab) आहे. हा एक सिद्धांत आहे जो गेल्या वर्षापासून चर्चेत आहे. सप्टेंबरपूर्वी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (WIV) मधून ते लीक झाल्याचे पुरेसे पुरावे आहेत. त्यानंतर कित्येक महिन्यांनी जगाने या रोगाकडे लक्ष देणे सुरु केले. अहवालात म्हटले आहे की, आमचा असा विश्वास आहे की हे पुरावे या वस्तुस्थितीकडे देखील सूचित करतात की व्हायरस WIV मधून लीक झाला असून 12 सप्टेंबर 2019 पूर्वी कधीतरी झाला असेल.

हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटीचे टॉप रिपब्लिकन आणि टेक्सासच्या 10 व्या कॉंग्रेस डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधी माइक मॅकल (Mike McCall) यांनी पॅनेलच्या रिपब्लिकन स्टाफने तयार केलेला अहवाल प्रसिद्ध केला. त्याच वेळी, त्यांनी कोविड -19 च्या उत्पत्तीच्या द्विपक्षीय चौकशी करण्याची मागणी केली.

चिनी शास्त्रज्ञ कोरोनाची तयारी करत होते!

रिपब्लिकन अहवालात नमूद करण्यात आले आहे की, प्रयोगशाळेतील सुरक्षा प्रोटोकॉल योग्य नव्हते. जुलै 2019 मध्ये, कचरा प्रक्रिया प्रणालीसाठी $ 1.5 दशलक्ष ची मागणी करण्यात आली. त्यात असे म्हटले आहे की, डब्ल्यूआयव्ही मधील चिनी शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसमध्ये बदल करून मानवांना संक्रमित करण्यासाठी काम करत आहेत आणि अशी हाताळणी लपविली जाऊ शकते. WIV ला अमेरिका आणि चीन सरकारकडून प्रचंड निधी मिळत होता. अमेरिकेचे अव्वल संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ.अँथनी फौसी यांनीही डब्ल्यूआयव्हीला हजारो डॉलर्सच्या निधीची कबुली दिली आहे.

डब्ल्यूएचओच्या तपासावर अमेरिका खूश नाही

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही गुप्तचर संस्थांना विषाणूचे मूळ शोधण्याचे काम दिले आहे. मॅकलचा अहवाल या प्रयत्नाला समांतर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शास्त्रज्ञांनीही विषाणूच्या उत्पत्तीची तपासणी केली आणि त्यासाठी त्यांनी वुहान शहराला भेट दिली. वुहान हे तेच शहर आहे जिथे WIV स्थित आहे आणि डिसेंबर 2019 मध्ये कोविडचा पहिला रुग्ण आढळला. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की विषाणू नैसर्गिकरित्या उद्भवला आणि प्राण्यांद्वारे मानवापर्यंत पोहोचला. मात्र, अमेरिकेला या अहवालाबाबत साशंकता होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT