Corona Dainik Gomantak
ग्लोबल

दक्षिण कोरियामध्ये कोरोना संसर्गाने केला कहर

ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची विक्रमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दैनिक गोमन्तक

दक्षिण कोरियामध्ये कोरोना संसर्गाने कहर केला आहे. ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची विक्रमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन एजन्सी (KDCA) नुसार, गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 (Covid-19) चे 1,09,831 रुग्ण आढळले आहेत. यासह, देशात आतापर्यंत एकूण 17,55,806 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (South Korea Corona Latest News Update)

दक्षिण कोरियामध्ये प्रथमच कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी तेथे एका दिवसात ९३,१३५ प्रकरणे आढळून आली होती. राजधानी सेऊलमध्येही ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. नवीन प्रकरणांपैकी 25,626 लोक राजधानीतील सोलचे रहिवासी आहेत. याशिवाय, ग्योन्गी प्रांत आणि इंचॉनच्या पश्चिम बंदरात नवीन संक्रमित लोकांची संख्या अनुक्रमे 36,507 आणि 7,342 होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लहान शहरांमध्येही हा विषाणू पसरत आहे. याशिवाय राजधानी नसलेल्या भागात संसर्गाची 40,240 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

कोरोनामुळे गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनामुळे गंभीर झालेल्या रुग्णांची संख्या 385 वर पोहोचली आहे. याशिवाय 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आता 7,283 झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूचे प्रमाण 0.41 टक्क्यांवर पोहोचले आहे.

किती लोकांना लसीकरण केले गेले?

दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत 4,47,79154 लोकांना किंवा एकूण लोकसंख्येच्या 87.3 टक्के लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. तर देशात 4,42,72,949 लोक किंवा 86.3 लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. याशिवाय 3,0068,482 लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT