Vladimir Putin  Dainik Gomantak
ग्लोबल

Russia-Ukraine War: पुतिन यांच्या हत्येचा कट! क्रेमलिनने 'या' देशावर केला मोठा आरोप

Putin Murder Attempt News: रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे.

Manish Jadhav

Putin Murder Attempt News: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले 'महायुद्ध' थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, अशा बातम्या समोर आल्या आहेत, ज्या रशियासाठी कोणत्याही दृष्टीने शोभनीय नाहीत.

मॉस्कोमध्ये, क्रेमलिनने दावा केला आहे की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला आहे आणि हत्येच्या कटात युक्रेनचा हात असल्याचे सांगितले आहे.

पुतिन यांच्यावर ड्रोन हल्ला करण्याची तयारी सुरु असल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे. त्यांच्या कार्यालयावर ड्रोन हल्ला झाला आहे. मात्र रशियन सैन्याने हा हल्ला हाणून पाडला.

ड्रोन कुठून आला?

क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे रशियाचे म्हणणे आहे. त्यांनी या हल्ल्याचा आरोप युक्रेनवर केला आहे. या हल्ल्याबाबत मात्र युक्रेनकडून (Ukraine) अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. क्रेमलिनवर ज्या ड्रोनने हल्ला केला होता, तो रशियाने पाडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन या हल्ल्यात पूर्णपणे सुरक्षित आहेत. क्रेमलिन हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते. क्रेमलिनमध्ये ड्रोन येणे ही तेथील सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याचे बोलले जात आहे.

क्रेमलिन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे

रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय क्रेमलिनमध्ये आहे. ते क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. अशा स्थितीत ड्रोन एवढ्या जवळ येणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

या हल्ल्याचा नक्कीच बदला घेणार असून लवकरच रशिया या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल, असे क्रेमलिनने म्हटले आहे.

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या या युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. रशियाच्या आरोपांना युक्रेनने प्रत्युत्तर दिले आहे. या हल्ल्याबाबत आम्हाला माहिती नसल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT