Military Plane Crash Dainik Gomantak
ग्लोबल

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Congo Military Plane Crash in Kwango State: आफ्रिकेतील कांगो या देशामध्ये एक अत्यंत भीषण विमान अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Congo Military Plane Crash in Kwango State: आफ्रिकेतील कांगो या देशामध्ये एक अत्यंत भीषण विमान अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अपघाताचे काही थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा विमान अपघात देशाच्या क्वांगो स्टेटमधील केंगे भागात झाला. किकविट शहरातून राजधानी किंशासाच्या दिशेने निघालेल्या या छोट्या लष्करी विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे पायलटला आणीबाणीच्या प्रसंगी इमर्जन्सी लँडिंग करणे भाग पडले.

मात्र, केंगे भागात कोणतीही अधिकृत लँडिंग स्ट्रिप उपलब्ध नसल्यामुळे पायलटला विमान एका मोकळ्या मैदानावर उतरवण्याचा प्रयत्न करावा लागला, परंतु त्याचवेळी विमान पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले आणि थेट लोकवस्ती असलेल्या भागात कोसळले. या दुर्घटनेची अधिकृत पुष्टी करताना क्वांगो स्टेटचे उप-राज्यपाल रेमी साकी बोकिंदा यांनी सांगितले की, विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि त्याला भीषण आग लागली, ज्यामुळे विमानाचे तुकडे-तुकडे झाले. या दुर्दैवी अपघातात (Accident) लष्कराच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 14 जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये कांगो सैन्याचे ऑडिटर जनरल 'जनरल लिकुलिया बाकुमी', एक मेजर, एक कॅप्टन आणि इतर काही लष्करी कर्मचाऱ्यांसह काही सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. आगीची तीव्रता इतकी होती की, विमानातील बारा जणांचे मृतदेह अत्यंत वाईट पद्धतीने जळाले, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले. याशिवाय पायलटचा मृतदेह दूर एका झुडपात पडलेला आढळला.

या भीषण दुर्घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने अधिकृत शोक संदेश जारी केला असून, मृतांच्या शोकाकुल कुटुंबांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या. तसेच, नेमक्या कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा कारणास्तव हा अपघात झाला, याचा सखोल शोध घेण्यासाठी देशाच्या विमानन दुर्घटना तपास संस्थेला तात्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सध्या कांगोच्या पूर्व भागात बंडखोरांसोबत लष्कराचा तीव्र संघर्ष सुरु आहे, अशा संवेदनशील काळात लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अशा अपघातात मृत्यू होणे हा कांगो देश आणि तिथल्या लष्करासाठी एक मोठा आघात मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT