Narendra Modi Dainik Gomanatk
ग्लोबल

PoK मध्ये नागरिकांवर अत्याचार; पंतप्रधान मोदींना मदतीसाठी हाक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) इम्रान सरकारच्या अत्याचाराची कहाणी जगापासून लपून राहीलेली नाही. अशा परिस्थितीत या भागातील लोक आता भारताकडे मदत मागण्यासाठी पुढे येत आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) इम्रान सरकारच्या अत्याचाराची कहाणी जगापासून लपून राहीलेली नाही. अशा परिस्थितीत या भागातील लोक आता भारताकडे मदत मागण्यासाठी पुढे येत आहेत. पीओकेमधील मुझफ्फराबादमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे स्थानिक प्रशासनाच्या कारवाईमुळे एका वृद्ध व्यक्तीला कुटुंबासह घर सोडावे लागले. या व्यक्तीचा सोशल मिडियावर (Social media) एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे मदत मागताना ऐकू येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसलेल्या वृद्धाचे नाव मलिक वसीम असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती रडताना दिसत आहे. पीएम मोदींकडून हस्तक्षेप करण्याची मागणी करत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, "पोलिस आणि अधिकाऱ्यांनी आमचे घर सील केले आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याला मुझफ्फराबादचे आयुक्त, तहसीलदार जबाबदार असतील." व्हिडिओमध्ये वसीमची पत्नी आणि मुले मागे बसलेले दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसीमला स्थानिक प्रशासनाने घरातून बाहेर काढले आहे. दबंग व्यक्तीने पोलिसांच्या मदतीने त्यांच्या जमिनीवर कब्जा केल्याचे सांगण्यात येत आहे. वसीम यांनी म्हटले की, आमची जमीन ही भारताची आहे. ती गैर-मुस्लिम आणि शीखांची आहे. पोलिसांनी हजारो लोकांची घरे सील केली असून आमची कुटुंबे आणि मुले रस्त्यावर राहण्यास भाग पाडत आहेत.

त्याच व्हिडिओमध्ये वडील पुढे म्हणाले- "मी पंतप्रधान मोदींना पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे आवाहन करतो. ही तुमची मालमत्ता आहे. ही मालमत्ता गैर-मुस्लिम आणि शिखांची आहे. इथल्या लोकांना अशा अत्याचारापासून वाचवा. पोलिस का? आम्हाला थंडीत राहण्यास भाग पाडले जात आहे. कोणत्या नियमाखाली त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT