Chinese President Xi Jinping  Dainik Gomantak
ग्लोबल

China: शी जिनपिंगच्या दडपशाहीला कंटाळून चिनी नागरिक सोडताहेत देश

शी जिनपिंग यांच्या राजवटीत चीनबाहेर आश्रय घेणाऱ्यांची संख्या अधिक

गोमन्तक डिजिटल टीम

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या दडपशाही धोरणांना कंटाळून चीनमधील श्रीमंत आणि मध्यमवर्गीय नागरिक देश सोडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. हाँगकाँग पोस्टच्या बातमीनुसार, जिनपिंगला कंटाळलेले चिनी नागरिक (Chinese) आता इतर देशांमध्ये राजकीय आश्रय शोधत आहेत. शी जिनपिंग यांच्या राजवटीत सततच्या आव्हानाचा सामना करण्याची आता त्यांची इच्छा नाही. असे तेथील नागिरक म्हणत आहेत.

देशात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर होणारा घाला, शिक्षणतज्ज्ञ, कार्यकर्त्यांचा आवाज दाबणे आणि व्यापारी आणि सेलिब्रिटी यांच्यावरील अत्याचार अशी अनेक कारणे देश सोडून जाणारे नागरिक देत आहेत.

असे असले तरी चिनी नागरिकांना राजकीय आश्रय मिळणे देखील तेवढे सोपे नाही. तरीही मागील तीन वर्षात देश सोडण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्तांच्या मते, 2012 मध्ये चीनमधून पलायन केलेल्या आश्रय-शोधकांची संख्या 15,362 होती. 2020 मध्ये ती वाढून 1,08,071 एवढी झाली आहे.

यावर्षी चीनबाहेरील देशांमध्ये आश्रय घेणाऱ्यांची संख्या 1 लाख 20 हजारच्या पुढे गेली आहे. शी जिनपिंग यांच्या राजवटीत चीनबाहेर आश्रय घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे केवळ चीनच्या मुख्य भूभागातच हे घडत नाही. तर, चीनने मानवी हक्कांचे उल्लंघन केलेल्या हाँगकाँगमधील (Hongkong) देखील लोक पळून जाऊन अमेरिका (America), ब्रिटन (Britain), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि कॅनडात (Canada) आश्रय घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT