Wang Yaping Dainik Gomantak
ग्लोबल

चीनच्या अंतराळवीर वांग यापिंगने रचला इतिहास , अंतराळात चालणारी ठरली पहिली महिला

चायना मेंंड स्पेस एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, चीनच्या (China) अंतराळ इतिहासात महिला अंतराळवीर अंतराळात फिरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात चीन आपल्या आर्थिक गतीबरोबर अंतराळ क्षेत्रामध्येही मोठ्याप्रमाणात प्रगतीचे उच्चांक गाठत आहे. यातच आता चीनच्या महिला अंतराळवीराने सोमवारी अंतराळात पायी चालत इतिहास रचला. अंतराळवीर वांग यापिंग (Wang Yaping) तिचा पुरुष सहकारी जी जिगांगसह तिथल्या निर्माणाधीन अंतराळ स्थानकातून बाहेर पडली आणि सहा तासांहून अधिक काळ इतर क्रियाकलापांमध्ये भाग घेतला. सरकारी प्रसारमाध्यमाकडून हे वृत्त देण्यात आले. अधिकृत न्यूज एजन्सी 'शिन्हुआ'च्या वृत्तानुसार, दोघेही स्पेस स्टेशनच्या कोर मॉड्यूल 'टियान'मधून बाहेर आले होते. सोमवारी पहाटे साडेसहा तास अंतराळात चालले आणि नंतर ते स्थानकावर यशस्वीपणे परतले. चायना मेंंड स्पेस एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, चीनच्या अंतराळ इतिहासात महिला अंतराळवीर अंतराळात फिरण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने तीन अंतराळवीरांना शेनझोऊ-13 मध्ये सहा महिन्यांसाठी अंतराळात पाठवले (Wang Yaping in Space). ते देशातर्फे परिभ्रमण संरचना ( Space station) पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून पाठविण्यात आले असून पुढील वर्षभरात स्थानक बांधणीचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

1997 पासून हवाई दलात रुजू झाले

शेडोंग प्रांतातील मूळ रहिवासी आणि पाच वर्षांच्या मुलीची आई, वांग ऑगस्ट 1997 मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) हवाई दलात सामील झाली. (Chinese Astronaut Makes History in Space) मे 2010 मध्ये PLA च्या अंतराळ युनिटमध्ये अंतराळवीरांच्या दुसऱ्या गटात सामील होण्यापूर्वी ती उप स्क्वाड्रन कमांडर होती. अंतराळात जाणारी ती दुसरी चीनी महिला आहे. सध्याच्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी डिसेंबर 2019 मध्ये त्यांची निवड झाली होती. वांग आणि झाई सोमवारी चालत असताना, त्यांचा तिसरा सहयोगी ये गुआंगफू त्यांना मॉड्यूलमधून महत्त्वपूर्ण पाठिंबा देत होता.

मिशन सहा महिने चालेल

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, चीनमधील एका महिलेसह तीन अंतराळवीर सहा महिन्यांच्या विक्रमी मोहिमेवर शेनझू- 13 येथून अंतराळ केंद्र तिआन्हेच्या कोर मॉड्यूलवर (Chinese Space Mission) पोहोचले आहेत. चीनी अंतराळवीर झाई झिगांग, वांग यापिंग आणि ये गुआंगफू स्पेस सेंटरमध्ये निर्माणाधीन कोर मॉड्यूलमध्ये आहेत. तिआन्हेचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ते सहा महिने तेथे असतील. चीनच्या इतिहासातील ही सर्वात लांब मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. स्पेस स्टेशनला भेट देणारी वांग ही चीनमधील पहिली महिला अंतराळवीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT