China Taiwan Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

China Taiwan Conflict: चिनी तणावादरम्यान तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक

तैवान त्याच्या प्रदेशाची सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी इतर प्राधिकरणांसोबत काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

China Taiwan Conflict: यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi Taiwan Visit) यांनी बुधवारी, 3 ऑगस्ट रोजी तैवान सोडले, परंतु चीन अॅक्शनमोडवर आला आहे. चीनने तैवानवर अनेक आर्थिक निर्बंध लादले. दरम्यान, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, त्यांची वेबसाइट काही काळासाठी हॅक झाली आहे. चीनच्या हॅकर्सनी हे हॅकिंग केले असल्याचे मानले जात असले तरी याला दुजोरा मिळालेला नाही.

सध्या, तैवान त्याच्या प्रदेशाची सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी इतर प्राधिकरणांसोबत जवळून काम करत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयासह अनेक सरकारी वेबसाइट्सना सायबर हल्ल्याचा फटका बसला. या वेबसाइट आणखी तीन रशियाच्या हॅकर्सनी हॅक केल्याचं काही अधिकाऱ्यांचं मत आहे.

त्यामुळे चीनचा थरकाप वाढला

खरे तर नॅन्सी पेलेसीच्या तैवान भेटीपासून चीनचा थरकाप इतका वाढला आहे की, तैवानच्या सीमेवर ड्रॅगनची घातक शस्त्रे धुमाकूळ घालू लागली आहेत. तैवान आणि अमेरिकेवर निशाणा साधत चीनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, बीजिंगला त्रास देणाऱ्यांसाठी हे चांगले नाही. चीनच्या सरकारी मीडियानुसार, परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इशारा दिला आहे की जो कोणी बीजिंगला त्रास देईल त्याला शिक्षा होईल.

नॅन्सी पेलोसीच्या तैवान दौऱ्यावर असताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हा एक तमाशा चालला आहे. तथाकथित लोकशाहीच्या नावाखाली अमेरिका चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत आहे. नॅन्सी पेलोसी यांची भेट तैवानमधील लोकशाहीबद्दल नाही, ती चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा मुद्दा आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT