China High Speed Maglev Train Twitter/@ZouYueTweets
ग्लोबल

Maglev Train: चीनची ट्रेन पळते विमानापेक्षाही वेगवान!; स्पिड ऐकून व्हाल थक्क

चीनने (China) जगातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

चीनने (China) जगातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन सुरू केली आहे. त्याचा वेग असा आहे की आपण हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल. मॅग्लेव्ह ट्रेनची (China High Speed Maglev Train) जास्तीत जास्त वेग 620 किमी प्रतितास आहे. चिनी माध्यमांचा असा दावा आहे की पृथ्वीवर धावण्यासाठी हे सर्वात वेगवान वाहन आहे. चीनच्या मीडियाच्या म्हणण्यानुसार या रेल्वेची सुरुवात किंगदाओमध्ये झाली आहे.(China started the worlds fastest train)

मिळालेल्या माहितीनुसार हा हायस्पीड ट्रेन प्रकल्प ऑक्टोबर 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता. सन 2019 मध्ये 600 किलोमीटर वेगाने या ट्रेनचा एक नमुना तयार करण्यात आला. यानंतर, जून 2020 मध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रकल्पात आघाडीचे अभियंता डिंग संसन (Sansan Ding) यांचे म्हणणे आहे की या ट्रेनमध्ये 10 कोच बसविता येतील. प्रत्येक डब्यात 100 प्रवासी बसू शकतात.

काही तासांत 1500 किमीचा प्रवास

प्रोजेक्टचे लीड इंजिनिअर डिंग संसन यांचे म्हणणे आहे की, लांब पल्ल्याचा प्रवास लक्षात घेऊन ही रेल्वे सेवा सुरू केली गेली आहे. ही ट्रेन 1500 कि.मी.च्या परिघामध्ये प्रवास करण्यासाठी चांगली आहे. एवढ्या वेगाने, हा लांबलचक प्रवास काही तासात व्यापला जाईल. या ट्रेनची कमाल वेग 620 किमी प्रतितास आहे. मॅग्लेव्ह गाड्या उच्च तापमान सुपर कंडक्टिंग (HTS) उर्जावर चालतात. यामुळे बसलेल्या प्रवाशाला असे वाटते की ट्रेन चुंबकीय ट्रॅकवर तरंगत आहे. या दरम्यान ट्रेन व ट्रॅकचा कोणताही संपर्क होत नाही. गेल्या दोन दशकांपासून चीन हे तंत्रज्ञान वापरत आहे.

2003 मध्ये ही ट्रेन 400 च्या वेगाने चालविली जात होती

चीन वेगवान गाड्यांच्या बाबतीत आधीपासूनच बर्‍यापैकी पुढे आहे. 2003 मध्ये चीनने 431 किलोमीटर तासाच्या वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन सुरू केली. शांघाय पुडोंग विमानतळ आणि लाँगयांग रोड दरम्यान ही ट्रेन धावते. पुढच्या वर्षी चीनची राजधानी बीजिंगमध्ये हिवाळी ऑलिम्पिक आहेत. यामुळे चीनला अधिकाधिक पायाभूत सुविधा विकसित करावयाची आहेत.

600 किमी वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन म्हणजे बीजिंग ते शांघाय दरम्यानचे 1000 किमी अंतर अवघ्या 2.5 तासांत पूर्ण होईल. तर विमानाने हा प्रवास पूर्ण करण्यास 3 तास लागतात. हा प्रवास वेगवान रेल्वेने 5.5 तासात पूर्ण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT