India China LAC Issue  Dainik Gomantak
ग्लोबल

चीनने भारताला पुन्हा डिवचले, नव्या नकाशात लडाख ते अरुणाचल प्रदेश दाखवला त्यांच्या देशाचा भाग

यासोबतच दक्षिण चीन समुद्रातील बेटांवरही त्यांनी आपला दावा केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

India China LAC Issue: भारतात होणार्‍या G-20 शिखर परिषदेपूर्वी चीनने नवा कांगावा केला आहे. भारतीय भूभागावर चीनने दावा करत, यामुळे येथील जमिनीवर कब्जा करण्याची त्यांची मानसिकता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

चीनने आपला अधिकृत नकाशा जारी केला असून, यात भारताचा लडाख ते अरुणाचल प्रदेश आपला भाग असल्याचे दाखवले आहे. यासोबतच दक्षिण चीन समुद्रातील बेटांवरही त्यांनी आपला दावा केला आहे. चीनचे अधिकृत माध्यम ग्लोबल टाईम्सने याबाबत माहिती दिली आहे.

अलीकडेच ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट झाल्यानंतर चीनने हा नकाशा प्रसिद्ध केला आहे. चीनच्या नकाशाची आवृत्ती अधिकृतपणे सोमवारी प्रसिद्ध केली. हा नकाशा चीन आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे संकलित केला आहे. असे ग्लोबल टाईम्सने X वर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

चीन एलएसीजवळील संवेदनशील भागात गावच वसविण्याचा प्रयत्न करत आहे. अशा आशयच्या बातम्या समोर येत आहेत. जियाकांगमधील पूर्वेकडील क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात अशी 628 गावे, तवांगमध्ये 30 आणि तुलुंग लामध्ये 25 गावे असल्याचा अंदाज आहे.

सामरिकदृष्ट्या, तवांग भारतातील अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील प्रवेश बिंदू आहे. तसेच, तिबेटी लोकांच्या दृष्टीने त्याचे धार्मिक महत्त्व आहे. चुमारच्या संवेदनशील भागातही अशा वस्त्या पाहायला मिळाल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार पश्चिम भूतान आणि उत्तर भूतानच्या भागातही चीनचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, या वस्त्यांना गावे समजू नयेत, असे अधिकाऱ्यांचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: “लिटल फॅट, ब्लॅक शर्ट”! नाव, टेबल नंबर सोडून थेट बॉडी-शेमिंग; बंगळुरुमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या कारभारानं खळबळ

Mhadei Water Dispute: 'म्हादईला आई म्हणणे सोपे, वाचविणे कठीण'; न्यायालयीन लढ्यात सरकारची उदासीनता! राजेंद्र केरकर यांची टीका

Myanmar Military Airstrike: म्यानमारमध्ये लष्कराचा बौद्ध मठावर भीषण हवाई हल्ला! 14 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

Saligao Constituency: साळगाव मतदारसंघामध्ये चुुरस, जयेश साळगावकर यांचा राजीनामा; केदार नाईकांपुढे पेच

Illegal Night Clubs: 'टिटोज लेन'वरील 17 नाईट क्लब्स रडारवर; आणखी 4 क्लबवर कारवाई, बेकायदा बांधकामांवर हातोडा

SCROLL FOR NEXT