Submarine

 

Dainik Gomantak

ग्लोबल

पाकिस्ताननंतर ड्रॅगनने टाकला बांगलादेशवर गळ!

या प्रकल्पासाठी चीनचे 230 हून अधिक तज्ञ पुढील महिन्यात बांगलादेशच्या शेख हसीना पाणबुडी तळावर पोहोचत आहेत.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान (Pakistan) पाठोपाठ आता चीनने भारताचा आणखी एक शेजारील देश बांगलादेशलाही आपल्या जाळ्यात अडकवले आहे. भारतीय गुप्तचरांना मिळालेल्या माहितीनुसार, चीन बांगलादेशचा शेख हसीना पाणबुडी (Sheikh Hasina submarine) तळ विकसित करत आहे, ज्याचा वापर तो स्वत:साठी करेल.

चीनने (Chaina) याआधी हा तळ विकसित करून बांगलादेशला (Bangladesh) द्यायचा होता, पण आता चीन हळूहळू ते आपल्या ताब्यात घेत आहे. या प्रकल्पासाठी चीनचे 230 हून अधिक तज्ञ पुढील महिन्यात बांगलादेशच्या शेख हसीना पाणबुडी तळावर पोहोचत आहेत.

हा दौरा 31 डिसेंबर ते 5 जानेवारी असा प्रस्तावित केला गेला आहे. काही तज्ञ तिथून परत जातील पण काही या तळावर बराच काळ राहिल्यानंतरच सर्व नियंत्रण आपल्या हातात घेतील. म्हणजेच त्याचे सर्व नियंत्रण चीनकडेच राहणार आहे.

2017 मध्ये पाणबुडी तळाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा पाणबुडी तळ तयार करण्यासाठी चीन बांगलादेशला मदत करत आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण शिष्टमंडळांच्या भेटीही गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत.

चीन बांगलादेशला इतर लष्करी उपकरणांसह रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुड्या, युद्धनौका आणि हवाई संरक्षण यंत्रणा देत आहे. मार्च 2016 मध्ये बांगलादेशच्या नौदलात दोन डिझेल अटॅक पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच 6 युद्धनौका, दोन अँटी-सर्फेस अँटी-सबमरीन पेट्रोलिंग बोटींचा समावेश आहे, ज्या बांग्लादेशला देण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षीच चीनने बांगलादेशला टाईप 053H जिआंगवेई क्लास 2 गेडेड मिसाइल फ्रीगेट दिले आहे. याआधी फ्रीगेटने दोन गिडेड क्षेपणास्त्रे दिली आहेत, जी 2014 पासून सतत सेवेत आहेत. 2018 साली दोन्ही देशांदरम्यान चिनी नौदलातून बंद करण्यात आलेल्या 2 फ्रिगेट्सचा करार झाला होता.

बांगलादेश नौदलामध्ये 4 स्टेल्थ गाईडेड मिसाईल कॉर्वेट्स आहेत. याच 2 सेमी स्टेल्थ लार्ज पेट्रोल क्राफ्ट व्यतिरिक्त चीनच्या मदतीने खुलना शिपयार्ड येथे बनवलेल्या डुरम क्लासच्या दोन सेमी स्टेल्थ लार्ज पेट्रोल क्राफ्टचा समावेश आहे. बांगलादेशच्या नौदलात 4 चीनी क्षेपणास्त्र नौकाही कार्यरत आहेत.

चीन केवळ आपले तळ तयार करण्याच्या नावाखाली बांगलादेशवर सतत कब्जा करत आहे, तर बांगलादेशला शस्त्रे देऊन चीन बांगलादेशलाही कर्जाच्या जाळ्यात अडकवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT