Latest China Robot  Dainik Gomantak
ग्लोबल

ड्रॅगनने बनवला बर्फावर धावणार 6 पायांचा विचित्र 'Robot'

चीनने सहा पायांवर धावणार नवीन रोबोट तयार केला आहे.

दैनिक गोमन्तक

चीनने (China) एक नवा रोबोट बनवला आहे. हा रोबोट बर्फावर चालू शकतो. शेनयांग येथून याचा एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे, ज्यामध्ये रोबोट वेगाने बर्फावर फिरताना दिसत आहे. तसेच भविष्यात हा रोबोट 5 G तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, असा चीनचा दावा आहे. हा रोबोट (Robot) बॉर्डरवर पेट्रोलिंग करणार असून बर्फाच्छादित पर्वतांवर या रोबतची मदत होणार आहे.

चीनच्या (China) शांघाय जिओ टोग विद्यापिठाने हा रोबोट (Robot) विकसित केला आहे. यात स्कीअरचे तंत्र समजून घेण्याची क्षमता सुसज्ज करण्यात आली आहे. हा रोबोट मानवसारखे स्की (Ski) करू शकतो. या कारणामुळे रोबोटमध्ये स्की पोल बसविण्यात आले आहेत. रोबोट बनवणाऱ्या टीमने हे दाखवून दिले की हा रोबोट बर्फावर (Snow) चांगल्या प्रकारे स्की करू शकतो. हा रोबोट 18 डिग्री उतारावर 10 मीटर प्रती या वेगाने स्की करू शकतो.

* रोबोट स्पर्धांमध्ये भाग घेतील

हा रोबोट (Robot) येत्या काळात स्कीइंगच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. डोंगराळ भागांमध्ये पेट्रोलिंग करणार आहे. हा रोबोट धावणे, चालणे, मार्ग बनवणे अनाई मानवाशी संवाद करणे असे अनेक कामे करू शकतो. या पूर्ण प्रोजेक्टला चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पाठिंबा दिला आहे. हा रोबोट कठीण परिस्थितिमध्ये चीनी सैनिकांना शस्त्रे पुरवू शकतो. हा रोबोट असा ठिकाणी काम करू शकतो जिथे मानवाचे काम करणे शक्य होणार नाही किंवा मानवासाठी काम करणे धोकादायक असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT