Chinese Rocket:  Dainik Gomantak
ग्लोबल

Chinese Rocket: चीनचे स्पेस रॉकेटवरील नियंत्रण सुटले; भारत किंवा अमेरिकेत कोसळण्याचा धोका

रॉकेटचे वजन 23 टन, 59 फुट उंची; स्पेनने बंद केली विमानतळे

गोमन्तक डिजिटल टीम

Chinese Rocket: चीनच्या कारवायांमुळे जगभरातील देश त्रस्त असताना आता पुन्हा एकदा चिनी रॉकेटने जगाला चिंतेत टाकले आहे. चिनचे एक रॉकेट अंतराळात नियंत्रणाबाहेर गेले असून ते कधीही पृथ्वीवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हे रॉकेट वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असून ते कुठे आणि कधी कोसळेल, याबाबत काहीही सांगता येत नाहीय. अंतराळतज्ज्ञांच्या मते शुक्रवार किंवा शनिवाही हे रॉकेट पृथ्वीवर कोसळू शकते. अर्थात पृथ्वीच्या वातावरणात येतानाच त्याचे तुकडे होतील. हे तुकडे अमेरिका, चीन, भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या काही भागात पडू शकतात.

हा धोका पाहून स्पेन या देशाने त्यांचे विमानतळ बंद केले आङेत. स्पॅनिश एअर ट्रॅफिक कंट्रोलला या रॉकेटचे काही तुकडे त्यांच्या देशावरून जाताना दिसले आहेत.

चीनचे हे रॉकेट 31 ऑक्टोबर रोजी सोडले गेले होते. याचे वजन 23 टन असून उंची 59 फुट इतकी आहे. पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेले उपग्रह, रॉकेट अनेकदा अंतराळात अनियंत्रित होतात. आणि अंतराळात भरकटून ते कधीतरी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करून पृथ्वीवर कोसळत असतात.

दरम्यान, अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने चिनी अधिकाऱ्यांमुळेच हा धोका निर्माण झाल्याचे सांगत चीनने यापुर्वीही असे बेजबाबदार वर्तन केल्याचे म्हटले आहे. दोन वर्षात चौथ्यांदा असा प्रकार घडत आहे. या आधी मे 2021 मध्ये हिंदी महासागरात आणि मे 2020 मध्ये आयव्हरी कोस्त येथे अशाच चिनी रॉकेटचे तुकडे पडले होते. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT