China Knife Attack Dainik Gomantak
ग्लोबल

China Knife Attack: चीनमधील बालवाडीत रक्तरंजीत थरार; तीन मुलांसह सहा जणांची चाकूने वार करून हत्या

China News: अलिकडच्या वर्षांत चीनमधील चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत, त्यापैकी अनेक घटना शाळांमध्ये घडल्या आहेत.

Ashutosh Masgaunde

Knife Attack in Chinas Kindergarten: चीनच्या आग्नेय ग्वांगडोंग प्रांतातील बालवाडीत तीन मुलांसह सहा जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की त्यांनी लिआनजियांग शहरातील वू नावाच्या 25 वर्षीय व्यक्तीला अटक केली.

वृत्तसंस्था एएफपीने स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, इतर मृतांमध्ये एक शिक्षक आणि दोन पालक आहेत. तसेच एक जण जखमी झाला आहे.

वृत्तानुसार, सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:40 वाजता हा हल्ला झाला.

पोलिसांनी हल्लेखोराला रात्री 8 वाजता अटक केली आणि हा 'पूर्वनियोजित हल्ला' असल्याचे म्हटले.

बालवाडीजवळ काम करणाऱ्या एका दुकान मालकाने सांगितले की, आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे.

चीनमध्ये असे गुन्हे तुलनेने दुर्मिळ आहेत, परंतु अलिकडच्या वर्षांत देशात चाकू हल्ला वाढला आहे, त्यापैकी अनेक शाळांमध्ये घडल्या आहेत.

चीनमध्ये चाकू हल्ले वाढत आहे

गेल्या ऑगस्टमध्ये आग्नेय जिआंग्शी प्रांतातील एका बालवाडीवर चाकूचा धाक दाखवणाऱ्या हल्लेखोराने हल्ला केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले होते.

एप्रिल 2021 मध्ये, बेलियू शहरात चाकूने सामूहिक हल्ला करताना दोन मुले ठार झाली तर 16 इतर जखमी झाले.

ऑक्टोबर 2018 मध्ये, दक्षिण-पश्चिम चीनमधील चोंगकिंग येथील बालवाडीत चाकू हल्ल्यात 14 मुले जखमी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

जंतरमंतरवर सरकारविरोधात तरुणाई, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT