Taliban

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

तालिबान्यांशी मैत्री करणं चीनला पडलं महाग, ड्रॅगनने 'या' मुद्यांवर व्यक्त केली चिंता

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानशी मैत्री केल्यानंतर चीनला (China) आपली चूक झाली समजू लागले आहे, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानशी मैत्री केल्यानंतर चीनला (China) आपली चूक झाली समजू लागले आहे, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अल अरेबियाच्या अहवालानुसार, दहशतवादाचे समर्थन आणि महिलांच्या हक्कांची दडपशाही करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तालिबानवरुन (Taliban) बीजिंगचा (Beijing) विश्वास उडत चालला असल्याचे दिसून येत आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, चीनने (China) अफगाणिस्तानातील सद्यस्थितीबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान आणि चीन यांच्यातील मैत्री वाढली होती.

अलीकडेच एका वरिष्ठ चिनी मंत्र्याने अफगाणिस्तानातील (Afghanistan) गुंतागुंतीच्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. अफगाणिस्तानचा वापर आयएसआयएस आणि अल-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी गटांकडून या प्रदेशात त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. अहवालात पुढे म्हटले आहे की, चीनला अफगाणिस्तानातील तालिबानशी मैत्री करण्यात आपली चूक लक्षात आली आहे. चार महिन्यांपूर्वी, ऑगस्टमध्ये युद्धग्रस्त देशात तालिबानशी मैत्री करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये चीनचा समावेश होता. चार महिन्यांनंतर बीजिंगचा तालिबानवरील विश्वास उडत आहे.

चीनला सतावतेय दहशतवादाची चिंता

यापूर्वी, 22 डिसेंबर रोजी चीनचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री वू जिआंघाओ (Wu Jianghao) म्हणाले, 'ज्या दहशतवादी संघटनांना सीमारेषेचा काहीच अर्थ कळत नाही, त्यांच्याशी एकटा देश लढू शकत नाही. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने हातमिळवणी करावी.' 28 ऑक्टोबर रोजी, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले की, अफगाण परिस्थितीतील बदलामुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. त्यात असेही म्हटले आहे की, दहशतवादी शक्तींकडून इंटरनेट आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा गैरवापर ही गंभीर समस्या बनली आहे.

चीनला अफगाणिस्तानला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग बनवायचे

15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला आणि तेव्हापासून हा देश आर्थिक, मानवतावादी आणि सुरक्षा संकटाशी झुंजत आहे.अफगाणिस्तानच्या खनिज संपत्तीवर अनेक वर्षांपासून देखरेख ठेवणाऱ्या चीनने त्याला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) अंतर्गत नाव दिले आहे. समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ऑगस्टनंतर चीनने या दिशेने फारच कमी काम केले आहे. खरेतर, चीनला शिनजियांगमधील सुन्नी उइघुर लोकांबद्दल चिंता आहे, कारण हे लोक तालिबानसोबत सैन्यात सामील होऊ शकतात अशी भीती चीनला वाटते. अहवालानुसार, बीजिंग तालिबानच्या वैचारिक अजेंड्यावर नेहमीच अस्वस्थ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT