china  Dainik Gomantak
ग्लोबल

10, 000 चिनी नागरिकांना मायदेशी परतण्यास पाडले भाग

चीनी सरकारने 10, 000 चीनी परदेशी नागरिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध परत मायदेशी बोलावले आहे.

दैनिक गोमन्तक

2014 पासून चीनने सुमारे 10, 000 चीनी (China) परदेशी नागरिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने परत बोलावले असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार चीनी न्यायिक व्यवस्थेने अपहरण, छळ आणि धमकावणे या गैरपद्धतीचा वापर केला आहे. स्पेनमध्ये (Spain) असलेल्या हक्क गट सेफ गार्ड डिफेंडर्सने ही माहिती दिली आहे.चीन परदेशात राहणाऱ्या चीनी नागरिकांवर कडक नजर ठेवतो. अहवालात आरोप करण्यात आला आहे की चीन परदेशात आपली पोलिस शक्ती वाढवत आहे आणि ते परदेशी भूमीवर बेकायदेशीरपणे कार्यरत आहे.

* नातेवाईकांना त्रास दिला आहे

चीनचे (china) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून चीनी न्यायिक व्यवस्थेला हवे असलेल्यांनी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. एनजीओने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीवर (Communist Party) टीका करणाऱ्यांच्या नातेवाईकांचा छळ करण्यात आला आणि एका चीनी परदेशी नागरिकाला फोन (Phone) केल्याबद्दल नातेवाईकांना (Relatives) ताब्यात घेण्यात आले.

* अहवालामध्ये सांगितले आहे की बहुतेक चीनी लोकांना चीन सोडायचे आहे. सेफगार्ड डिफेंडर्सनी त्यांच्या अंदाजात सरकारी आकडेवारीनुसार 2014 पासून सुमारे 10, 000 चीनी नागरिकांना जबरदस्तीने मायदेशी बोलावले आहे. अधिकृत आकडेवारी दर्शवते की बीजिंगने गेल्या दोन वर्षात सुमारे 2500 चीनी परदेशी नागरिकांना मायदेशी बोलावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT