King Charles
King Charles Dainik Gomantak
ग्लोबल

King Charles: आता चार्ल्स यांचा अध्याय सुरु, विल्यम-केट प्रिन्स, तर...

दैनिक गोमन्तक

King Charles: ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र 73 वर्षीय चार्ल्स आता प्रोटोकॉलनुसार राजा बनले आहेत. राणीच्या विक्रमी 70 वर्षांच्या कारकिर्दीनंतर राजघराण्याचा नवा अध्याय सुरु झाला आहे. चार्ल्स यांचा राज्याभिषेक, एका विशिष्ट तारखेला होणार आहे.

तथापि, ब्रिटीश राजेशाहीचा सुवर्णकाळ आता निघून गेला आहे का, आधुनिक युगात प्राचीन संस्था कशी व्यवहार्य राहू शकते. चार्ल्स आपल्या आईच्या सावलीत राज्य करतील का, असे प्रश्न आता विचारले जातील.

दोनच दिवसांपूर्वी, राणीने हसत हसत लिझ ट्रस यांना त्यांच्या कारकिर्दीतील 15 वे पंतप्रधान म्हणून नियुक्त केले होते. यावेळी, अशक्त असल्याने त्या काठीचा आधार घेताना दिसल्या होत्या. त्यांच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत इंग्लंडमध्ये (England) आर्थिक, सामाजिक, राजकीय मोठ्या उलथापालथी झाल्या.

राजाची पहिली घोषणा

प्रिव्ही कौन्सिल एका दिवसानंतर पुन्हा बसेल. प्रिव्ही कौन्सिलच्या बैठकीतही राजे चार्ल्स उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नवीन राजे चर्च ऑफ स्कॉटलंडचे रक्षण करण्याची शपथ घेतील. चार्ल्संना नवा राजा घोषित करण्यासाठी जाहीर घोषणा केली जाईल. यानंतर हायड पार्क, टॉवर ऑफ लंडन आणि नौदलाच्या (Navy) जहाजांकडून तोफांची सलामी दिली जाईल. त्याच वेळी, एडिनबर्ग, कार्डिफ आणि बेलफास्टमध्ये चार्ल्सं यांच्या राज्याभिषेकाचे घोषणापत्र वाचले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

SCROLL FOR NEXT