Rhiannon Harries with Husband Twitter/@RhiannonUKGov
ग्लोबल

प्यार की धून! ब्रिटीश महिला अधिकारी झाली भारताची सून

ब्रिटनच्या डेप्युटी ट्रेड कमिशनर रिआनन हॅरीस यांनी ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले

दैनिक गोमन्तक

ब्रिटनच्या (British) डेप्युटी ट्रेड कमिशनर रिआनन हॅरीस (Rhiannon Harries) यांनी ट्विटरवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले करत भारता लग्न केल्याची माहिती दिली. मला भारतात आयुष्यभराचे प्रेम मिळेल आणि मी लग्न करेल, असे मला कधीच वाटले नव्हते म्हणत त्यांना हे फोटो शेअर केले आहे.

रिआनन हॅरीस यांनी एका भारतीय तरुणाशी लग्न केले आहे. मात्र फोटो शेअर करत असताना त्यांनी आपल्या पतिबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. त्याच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत असून लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रिआनन हॅरीस भारताची राजधानी दिल्ली येथे कार्यरत असून त्याच्या प्रोफाइलनुसार त्या समानता आणि हरित अर्थव्यवस्थेच्या समर्थक आहे. हा आयुष्यभराचा प्रवास करायला आवडणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

रिआनन हॅरीस यांनी सांगितले की, "4 वर्षांपूर्वी मी अनेक आशा घेऊन भारतात आल होती.पण मला आयुष्यभराचे प्रेम (Love) इथे मिळेल असे वाटले नव्हते.भारत आता माझे घर झाले आहे याचा मला खूप आनंद होत आहे," असे म्हणत त्यांनी आपला आनंद सोशल मिडियावर शेअर केला.

'मला अतुल्य भारतात (India) मला आनंद मिळाला आहे. #IncredibleIndia तसेच #shaadi #livingbridge #pariwar' आपल्या लग्नाची बातमी देत आणि फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी हा अतिशय भावनिक संदेश दिला आहे. आणि हॅशटॅग देखील वापरले आहेत.

युजर्सच्या शुभेच्छा

रिआनन हॅरीस यांच्या पोस्टवर युजर्स शुभेच्छा देत आहेत, एका यूजरने लिहिले, 'तुम्हा दोघांना वैवाहिक आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.' त्याचवेळी, एका युजरने त्यांच्या पतीबद्दल विचारले आहे, परंतु त्यांनी अद्याप पतीबद्दल काहीही खुलासा केला नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी ब्रिटनचे उपउच्चायुक्त अँड्र्यू फ्लेमिंग यांनी रिआनन हॅरीस यांच्या लग्नाबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या वतीने हॅरी आणि तिच्या पतीला खूप शुभेच्छा असे म्हणत त्यांनी हॅरीस यांचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT