Russia Ukraine War Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: ब्रिटनने युक्रेनला केलेली 'ही' मदत वाढवणार रशियाची डोकेदुखी...

पंतप्रधान ऋषी सुनक यांचा महत्वपूर्ण निर्णय

Akshay Nirmale

Russia Ukraine War: युरोपीय देश आणि अमेरिका युक्रेनला मदत करत असल्यानेच युक्रेन आजही रशियाविरूद्धच्या युद्धात ठामपणे उभा आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 11 महिन्यांपासून सुरू आहे. या काळात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. पण तरी या युद्धाचा शेवट काय होईल, हे सध्या कुणीही सांगू शकत नाहीय. युरोपीय देश आणि अमेरिका युक्रेनला मागून मदत करत असल्याचा आरोप होत आहे, त्यामुळेच युक्रेन आजही रशियासमोर ठामपणे उभा आहे. त्यातच आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनला रणगाड्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

11 महिन्यांनंतरही रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. युक्रेन खंबीरपणे लढा देत असून वेळोवेळी त्यांनी रशियन सैन्याचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखाइलो पोडोल्याक यांनी नुकतेच म्हटले होते की, पाश्चात्य देशांनी शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढविल्यास युक्रेन यावर्षी युद्ध जिंकू शकेल. विशेषत: लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली युक्रेनला मिळाली तर बरे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

या मदतीसाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांचे आभार मानले आहे. चॅलेंजर्स 2 नावाचे हे रणगाडे आहेत. जवळपास 10 रणगाडे ब्रिटन युक्रेनला देणार आहे.

दरम्यान, रशियातील निर्वासित विरोधी राजकीय नेते पोनोमारेव्ह यांनी पुतिन यांच्याबाबत एक घोषणा केली आहे. पुतिन यांनी युक्रेनच्या प्रदेशावर कब्जा केला असला तरी पुतिन रशियातून या प्रदेशावर नियंत्रण राखू शकत नाहीत. तसेच, कीव्हवरील अयशस्वी कारवाई पुतिन यांच्यासाठी घातक ठरेल. पोनोमारेव्ह यांना रशियात लोकशाही राज्यघटना लागू करावी, असे वाटते. त्यासाठी त्यांनी रशियाच्या पीपल्स डेप्युटीजची पहिली काँग्रेस आयोजित करून पुतीन यांना हटविण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

SCROLL FOR NEXT