Charles Sobhraj Dainik Gomantak
ग्लोबल

Charles Sobhraj : 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराजची होणार सुटका, 19 वर्षांपासून तुरुंगात बंद

Nepal News: नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Nepal News: नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. हत्येच्या आरोपाखाली तो 2003 पासून नेपाळी तुरुंगात बंद आहे. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांत त्याला हद्दपार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. गुन्हेगारी जगतात 'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, शोभराजवर 1975 मध्ये नेपाळमध्ये जाण्यासाठी बनावट पासपोर्टचा (Passport) वापर करुन अमेरिकन नागरिक कोनी जो बोरोन्झिच आणि त्याची कॅनेडियन मैत्रीण लॉरेंट कॅरियर या दोन पर्यटकांची हत्या केल्याचा आरोप होता.

2003 मध्ये अटक करण्यात आली होती

1 सप्टेंबर 2003 रोजी एका वृत्तपत्राने त्याचा फोटो प्रकाशित केल्यानंतर शोभराज नेपाळमधील कॅसिनोबाहेर दिसला होता. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्याविरुद्ध 1975 मध्ये काठमांडू आणि भक्तपूर येथे दाम्पत्याच्या हत्येचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. तो काठमांडूच्या मध्यवर्ती कारागृहात 21 वर्षांची शिक्षा भोगत आहे. अमेरिकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी त्याला 20 वर्षे आणि बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT