kabul airport Dainik Gomantak
ग्लोबल

काबूल विमानतळावर मोठा ब्लास्ट

या ब्लास्टची पुष्टी पेटांगॉनकडून करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. तालिबान राजवट स्थापन झाल्यामुळे अनेक अफगाण नागरिक देश सोडून जाऊ लागले आहेत. यातच काबूल विमानतळावर आज मोठा ब्लास्ट झाला आहे. या ब्लास्टमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या ब्लास्टची पुष्टी पेटांगॉनकडून करण्यात आली आहे. यापूर्वी अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेकडून काबूल एअरपोर्टवर अलर्ट जारी करण्यात आला होता.

दरम्यान, अमेरिकेने (USA) अफगाणिस्तान (Afghanistan), काबुल विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्या आपल्या नागरिकांना तेथून त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले होेते. काबुल विमानतळाबाहेर (Kabul Airport) उभ्या असलेल्या अमेरिकेच्या तसेच इतर नारिकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली होती. (US raised the possibility of a terrorist attack).म्हणूनच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या नागरिकांना सावध केले होते. काबूलमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले होते की जे विमानतळाच्या एबी गेट, ईस्ट गेट आणि उत्तर गेटवर उपस्थित आहेत, त्यांनी त्वरित निघून जावे. अमेरिकेने आधीच दहशत व्यक्त केली होती की दहशतवादी कधीही विमानतळावर हल्ला करू शकतात.

उल्लेखनीय म्हणजे, काबूल विमानतळाची सुरक्षा पूर्णपणे अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतली आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केल्यानंतर देश सोडून जाणाऱ्या लोकांचा मोठा जमाव विमानतळावर जमला. यामुळे तेथे येणाऱ्या बचाव विमानांना लँडिंग आणि उड्डाण करताना अडचणींचा सामना करावा लागला. या गोंधळामुळे विमानतळावरून विमानांची हालचाल काही काळ थांबली होती.

एका व्हिडिओमध्ये अमेरिकेच्या हवाई दलाच्या सी -17 ग्लोबल मास्टरचे लँडिंग गिअर लँडिंग गिअर आणि इतर ठिकाणी लटकलेले दिसले. या फुटेजमध्ये अमेरिकन विमान हवेत पोहोचल्यानंतर काही लोक पडतानाही दिसत होते. ही अराजकता थांबवण्यासाठी अमेरिकन सैनिकांनी गोळीबारही केला होता.

यानंतर अमेरिकेने चौकशी केली होती की गर्दी विमानाच्या इतक्या जवळ कशी पोहोचली की केवळ विमानच नव्हे तर अमेरिकन सैनिकांची सुरक्षाही धोक्यात आली.आता अमेरिकेने या विमानतळाची सुरक्षा स्वतःच्या हातात घेतली आहे. तथापि, केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर इतर देशांतील लोक विमानतळाच्या बाहेर उपस्थित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT