Vaccination Dainik Gomantak
ग्लोबल

अ‍ॅस्ट्रा-फायझर लसी एकत्र देणं फायद्याचं: ऑक्सफर्ड

जगभरात कोरोनाचं संकट (Covid 19) घोंघावत असताना दुसरीकडे मोठ्याप्रमाणात लसीकरण (Vaccination) मोहीम राबवण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचं संकट (Covid 19) घोंघावत असताना दुसरीकडे मोठ्याप्रमाणात लसीकरण (Vaccination) मोहीम राबवण्यात येत आहे. परंतु कोरोनाच्या डेल्टा (Delta) या नव्या प्रकारानं डोकं वर काढलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा डेल्टा हा प्रकार अल्फा प्रारुपापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) आणि फायझर (Pfizer) या दोन्ही लसी एकत्र रुग्णाला दिल्या तर कोरोना महामारीविरुध्द लढण्यासाठी चांगल्या अँटीबॉडीज (Antibodies) तयार होतात, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने (Oxford University) केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. लॅन्सेटमध्ये (Lancet) त्यांचा हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

अ‍ॅस्ट्राझेनेका पाठोपाठ जर लगेच फायझरची लस घेतली असल्यास इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी त्याचा फायदा होतो. केवळ 4 आठवड्यातच रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे या संशोधनामधून समोर आले आहे. यासंबंधीचा दावा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मॅथ्यू यांनी केला आहे. मिक्स अँड मॅच लसीकरण केल्यामुळे डेल्टा प्रारुपाच्या विरोधात उत्तम संरक्षण पुरवता येऊ शकते, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक मॅथ्यू स्नॅप यांनी म्हटले आहे.

अ‍ॅस्ट्राझेनेकाची व्हॅक्सिन घेतल्यानंतर चार आठवड्यांनी ज्या व्यक्तींनी फायझरची लस घेतली. त्यांच्यामधील अँटीबॉडीज तब्बल नऊ पटीने वाढल्याचं निदर्शनास आले आहे. ज्या व्यक्तींनी दोन्ही कोरोना लसी अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या घेतल्या आहेत, त्यांच्या तुलनेत ही वाढ पाच पटीने अधिक वाढलं असल्याचं दिसून आले आहे.

जर एखाद्याने अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला असेल तर तुम्हाला RNA लस घेतल्याचा नक्की फायदा होईल. तसेच कोव-बूस्ट नावानेदेखील एक अभ्यास केला आहे. ज्यामध्ये फायझर अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या कॉम्बिनेशनवर अधिक अभ्यास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT