In Belgium Santa Claus came but gave Corona gift and left 
ग्लोबल

बेल्जियममध्ये सांता ख्रिसमस सेलिब्रेशनच्या उद्देशानं आला पण लोकांना कोरोनाचे गिफ्ट देवून गेला

दैनिक गोमन्तक

बेल्जियम: कोरोनाचं संकट जगभर असताना सगळीकडे सण उत्सव साजरे केले गेले. तेव्हा या उत्सवांमध्येही कोरोनाच एक वेगळच रूप पाहायला मिळालं. त्यातच अनेक ठिकाणी यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशन च्या वेळी लोकांना मन मारावं लागलं. पण, असं असताना देखिल कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले.

सध्या सोशल मीडियावर सगळीकडे अशीच चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे बेल्जियममधील एका सांताक्लॉजची. ख्रिसमस साजरा करण्याकरीता येणारा सांताक्लॉज आनंद, उत्साह आणि गिफ्टची उधळण करत येतो. बेल्जियममध्येही तो याच उद्देशानं आला पण, जाता जाता तो इथल्या लोकांना कोरोनाचे गिफ्ट देवून गेला.

बेल्जियममध्ये सांताक्लॉजचं गिफ्ट महागात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिथं सांताक्लॉज झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार झाल्याची बीतमी समोर येत आहे.

कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन असूनही अनेकांनी या नियमांचे हवे तसे पालन केले नाही. यानंतर काय झालं ते बेल्जियममध्ये बघायला मिळालं. मागील आठवड्यात एका होम केअर सेंटरमध्ये ही घटना घडल्याची बाब समोर आली. ख्रिसमस पार्टीत असणाऱ्या अनेकांना कोरोनाची लक्षणं दिसून आली आणि त्यांच्या चाचणीचे अहवालही पॉझिटीव्ह आले.

आनंद देण्यासाठी आलेल्या सांताक्लॉजला कोरोनाची लागण झाल्याची घटना पुढे आली आणि आनंदाऐवजी कोरोनाचाच प्रसार झाल्यामुळं खळबळ उडाली सांताक्लॉज कोरोना पॉझिटीव्ह असल्याच लक्षात आल्याबरोबर होम केअर सेंटरमधील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये 157 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यामध्ये 36 कर्मचाऱ्यांचाही समावेश असून या संसर्गामुळं 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

बेल्जियनममधील स्थानिक महापौरांच्या माहितीनुसार कोरोनाच्या कुठल्याच नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं. पार्टीदरम्यान मास्कचा वापरही करण्यात आला नव्हता, शिवाय सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नव्हतं. त्यामुळंच हे संकट ओढावल्याची माहिती या भागातील स्थानिक महापौरांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मी शाहरुखसोबत काम केलं कारण...", अर्शद वारसीने 'किंग' सिनेमाबाबत केले मोठे वक्तव्य; आर्यनबाबत म्हणाला की ' तो तर........'

पत्रिका वाटल्या, पाहुणे जमले... लग्नाच्या दिवशीच दोन शिक्षिका बहिणींनी संपवलं जीवन, लग्नाचं घर झालं स्मशान; जोधपूरमधील धक्कादायक घटना

Borim Accident: दुर्दैवी घटना! विचित्र अपघातात बोरीतील तरुण ठार; गोव्यातील अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

VIDEO: "सूर्या अती करतो...!", विराटनंतर मांजरेकरांच्या निशाण्यावर भारतीय कर्णधार, संथ खेळीवरुन साधला निशाणा; व्हिडिओ व्हायरल

ईराणचा युरोपला दे धक्का! युरोपियन युनियनच्या नौदल अन् हवाई दलाला केलं 'दहशतवादी' घोषित; आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT