Baloch Liberation Army Attack Pakistani Army Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Blast: पाकिस्तानी आर्मीवर मोठा हल्ला! IED स्फोटात 10 सैनिक ठार, बलुच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी

Baloch Liberation Army Attack: बीएलएच्या अधिकृत निवेदनानुसार हा हल्ला मार्गट परिसरात झालेला आहे, जिथे झालेल्या या स्फोटामध्ये पाकिस्तानी सैन्याचे वाहन नष्ट झाले आहे.

Sameer Panditrao

पाकिस्तानातील क्वेटाजवळ झालेल्या एका प्राणघातक हल्ल्यात बलुच लिबरेशन आर्मी (BLA ) ने रिमोट-कंट्रोल्ड इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IED) वापरून पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर बॉम्बस्फोट केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बीएलएच्या अधिकृत निवेदनानुसार हा हल्ला मार्गट परिसरात झालेला आहे, जिथे झालेल्या या स्फोटामध्ये पाकिस्तानी सैन्याचे वाहन नष्ट झाले आहे आणि सोबतच दहा सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

बीएलएचे प्रवक्ते जियंद बलूच यांनी पत्रकार परिषदेमध्ये या हल्ल्याबाबत माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की हे ऑपरेशन या प्रदेशावर कब्जा करू पाहणाऱ्या सैन्याच्या तुकडीविरुद्ध होते आणि ते यशस्वी झालेले आहे. या गटाने या हल्ल्याला होणाऱ्या आक्रमणांविरुद्धच्या प्रतिकार प्रयत्नांचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या महिन्यात याच फुटीरतावादी गटाशी संबंधित एका हाय-प्रोफाइल घटनेनंतर हा हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. त्या घटनेमध्ये, बीएलएच्या गटाने बोलानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते आणि ३३९ प्रवाशांना ओलीस ठेवले होते.

क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या रेल्वे रुळावर स्फोटकांचा स्फोट झाला, ज्यामुळे एका बोगद्यानजीक अनेक डबे आणि इंजिन रुळावरून घसरले. या घटनेमध्ये जवळपास २५ लोकांचा मृत्यू झाला होता.

अधिकाऱ्यांनी आयईडी हल्ल्याबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. याबाबत तपास सुरु आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT