Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Venga: बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरली खरी, काही तासांत...

Baba Venga's Prediction: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 या वर्षासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत.

Manish Jadhav

Baba Venga's Prediction: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 या वर्षासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत.

1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगी यांची वयाच्या 10-11 व्या वर्षी दृष्टी गेली. दृष्टी गमावल्यानंतर, त्यांची मानसिक क्षमता वेगाने विकसित होऊ लागली.

बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले, त्यानंतर त्यांचे अनुयायी त्यांच्या भाकितांबद्दल जगाला सांगू लागले.

दरम्यान, लहानपणापासून अंध असूनही, त्यांनी असाधारण मानसिक क्षमता विकसित केली, ज्यामुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

बाबा वेंगा यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack), फुकुशिमा आण्विक आपत्ती आणि ISIS चा उदय यांसह अनेक घटनांचे अचूक भाकीत वर्तवल्याचे सांगितले जाते.

त्यांच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की, बाबा वेंगा यांनी 5079 साली जगाचा अंत होईल, असे भाकित वर्तवले होते.

आता, बाबा वेंगांच्या भाकितांबद्दल बोलूया... ज्याबद्दल सर्व शास्त्रज्ञ (Scientist) चिंतेत आहेत. बाबा वेंगा यांनी भाकित वर्तवले होते की, 2023 मध्ये पृथ्वीवर एक वादळ धडकेल.

सध्या या वादळाबाबत शास्त्रज्ञांची चिंताही वाढली आहे. विज्ञान सांगते की, दर 11 वर्षांनी सूर्य सक्रिय होतो. ही सौर क्रिया त्याचाच परिणाम आहे.

याआधी 2024 किंवा 2026 मध्ये तो पाहायला मिळेल असे बोलले जात होते. पण आता ते 2023 मध्येच कहर करण्याच्या तयारीत आहे. त्याला सोलर मॅक्सिमम देखील म्हणतात.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही सोलर मॅक्सिमम 19 एप्रिल 2023 रोजी धडकू शकते.

त्याचा परिणाम 20 एप्रिल 2023 रोजीही दिसून येईल. मात्र यामुळे पृथ्वीवर समस्या निर्माण होऊ शकतात. सूर्याच्या सक्रिय अवस्थेत सौर ज्वाला मोठ्या प्रमाणात विद्युत चुंबकीय ऊर्जा सोडतील.

त्यामुळे पॉवर ग्रीड आणि जीपीएस सिग्नलसह सर्व प्रकारची यंत्रणा विस्कळीत होऊ शकते. त्याला सोलर मॅक्सिमम देखील म्हणतात.

सोलर मॅक्सिमम एपिसोड अंदाजे दर 11 वर्षांनी होतात. तसे, गेल्या काही वर्षांत, यामुळे कोणतीही मोठी समस्या दिसली नाही.

सोलर मॅक्सिममदरम्यान सूर्यामध्ये विस्फोट होतात. यामुळे, सूर्याच्या बाह्य पृष्ठभागावरुन कोरोनल मास इजेक्शन होते आणि त्याचा पृथ्वीवर परिणाम होतो.

त्यामुळे उपग्रहांमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते. यासोबतच पृथ्वीवरील पॉवर ग्रिडवरही चुकीचा परिणाम होऊ शकतो.

त्याची तीव्रता वाढल्यास पृथ्वीच्या कक्षेत उपस्थित असलेल्या अंतराळवीरांसाठी धोका निर्माण होऊ शकतो.

जेव्हा हे सौर वादळ पृथ्वीवर आदळते तेव्हा मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होताना दिसतो. त्यामुळे दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT