Baba Venga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: बाबा वेंगाच्या या भाकितांमुळे घाबरले जग, 2023 मध्ये असे काहीसे घडणार !

Baba Vanga Predictions: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची अनेक भाकीते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत.

दैनिक गोमन्तक

Baba Venga Predictions for 2023: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची अनेक भाकीते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत. त्यांच्या भाकितांसंबंधी अनेकदा चर्चाही होते. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती, ज्याबद्दल जगभरात भीतीचे वातावरण आहे. बाबा वेंगा यांनी 2022 वर्षासाठी अनेक भाकिते केली होती, त्यापैकी 2 आत्तापर्यंत खरी ठरली आहेत, त्यानंतर आता 2023 च्या भाकितांवर चर्चा होत आहे.

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय 2028 साली अंतराळवीर शुक्र ग्रहावर प्रवास करणार आहेत. बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार, 2046 मध्ये, अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने लोक 100 वर्षांहून अधिक जगू शकतील.

या वर्षी भारतात उपासमारीचा अंदाज

द सनच्या वृत्तानुसार, बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले होते की, '2022 मध्ये जगभरातील तापमानात घट होईल. त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल, जे भारतावर हल्ला करतील. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय, भारतात तीव्र उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.'

यावर्षी 2 अंदाज खरे ठरले

बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली होती, त्यापैकी 2 आत्तापर्यंत खरी ठरली आहेत. ऑस्ट्रेलिया (Australia) व्यतिरिक्त बाबा वेंगा यांनी काही आशियाई देशांमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांच्या भाकितांनुसार आता ऑस्ट्रेलियात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर पाकिस्तानमध्ये (Pakistan) आलेल्या पुरामुळे 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईचा अंदाज त्यांनी वर्तवला होता. या अंदाजानुसार, पोर्तुगालमध्ये (Portugal) पाणीटंचाई जाणवत आहे, तर इटलीमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

2022 ची इतर 4 भाकिते आता खरी ठरतील का?

बाबा वेंगा यांनी सायबेरियातून 2022 मध्ये नवीन प्राणघातक विषाणूचा उदय होण्याची भविष्यवाणी केली होती. यासोबतच बाबा वेंगा यांनी एलियन हल्ला, टोळांचे आक्रमण आणि आभासी वास्तवात वाढ होण्याचीही भविष्यवाणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT