Terrorist organizations using AI Dainik Gomantak
ग्लोबल

AI Misuse By Terrorists: जगासमोर मोठे संकट! दहशतवादी संघटना घेताहेत ‘एआय’ची मदत; सोशल मीडियावरून हल्ल्याची शक्यता

Terrorist organizations using AI: जगभरात अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ‘एआय’चा वापर वाढत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा चुकीच्या गोष्टींसाठीही वापर होण्याची भीती तज्ज्ञांना सतावते.

गोमन्तक डिजिटल टीम

वॉशिंग्टन: जगभरात अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ‘एआय’चा वापर वाढत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा चुकीच्या गोष्टींसाठीही वापर होण्याची भीती तज्ज्ञांना सतावते. दहशतवादी संघटना ‘एआय’ तंत्रज्ञानाबरोबर प्रयोग करत आहेत. या संघटनांसाठी नवीन सदस्यांची भरती, खऱ्या प्रतिमांसारख्या भासणाऱ्या डीपफेक प्रतिमा तयार करणे आणि सायबरहल्ल्यांसाठी ‘एआय’ शक्तीशाली साधन ठरू शकते, असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर संस्थांनी दिला आहे.

गेल्या महिन्यात इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित संकेतस्थळावर एकाने आपल्या कारवायांसाठी ‘एआय’ चा वापर करण्याचे आवाहनही केले होते. ‘एआय’ बद्दलची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे, असेही त्याने लिहिले होते. काही गुप्तचर संस्थांना ‘एआय’ भरती प्रक्रियेत योगदान देईल, अशी वाटत असलेली भीती सत्यात उतरवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काही वर्षांपूर्वी इराक व सिरियाचा प्रदेश काबीज करणाऱ्या आयएसचे आता हिंसक विचारसरणीच्या दहशतवादी गटांची विकेंद्रित आघाडी बनली आहे. भरती आणि चुकीची माहिती पसरविण्यासाठी सोशल मीडिया शक्तिशाली साधन बनू शकते, त्यामुळे, आता त्यांच्याकडून ‘एआय’ची चाचपणी केली जात असल्याची बाब आश्चर्यजनक नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या अल्गोरिदमशी जोडले गेलेले हे बनावट कंटेंट कल्पनाही करता येणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचार करू शकतात. यामुळे नवीन समर्थकांची भरती करणे, शत्रूंमध्ये संभ्रम किंवा भीती निर्माण करणे आणि प्रभावी प्रचार करणे अधिक सोपे झाले आहे. दहशतवादी गटांनी इस्त्रायल-हमास युद्धाची रक्तरंजित वर्णन करणारी बनावट छायाचित्रे ही शेअर केली होती.

यात बॉम्बहल्ल्यात उद्‌ध्वस्त झालेल्या इमारती, अनाथ बालकांचा समावेश होता. त्यामुळे संतापाचा लाट उसळली तसेच ध्रुवीकरणही वाढले. पश्चिम आशियातील दहशतवादी गटांनी तसेच अमेरिका व इतर ठिकाणच्या ज्यूविरोधी गटांनीही नवीन सदस्यांच्या भरतीसाठी या छायाचित्रांचा वापर केला.

कोणत्याही शत्रूसाठी त्याची उद्दिष्टे साध्य करणे ‘एआय’मुळे बरेच सोपे होऊ शकते. फारसा पैसा नसलेला छोटा गटही एआयच्या वापरामुळे आपला प्रभाव निर्माण करू शकतो. दहशतवादी गटांनीही या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला, त्यानंतर त्यांनी खरी वाटणारी छायाचित्रे, व्हिडिओ तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविला आहे.
जॉन लॅलिबर्ट, सीईओ, क्लिअरव्हेक्टर
‘एआय’चा वापर करणारे वाईट प्रवृत्तीचे लोक मग ते दहशतवादी असोत की गुन्हेगारी हॅकर्स परदेशी गुप्तहेर आपल्या एआय उत्पादनांचा वापर कसा करतात, याची माहिती अमेरिकेने त्यांच्या निर्मात्यांपर्यंत सहजपणे पोचविणे सक्तीचे केले पाहिजे.
मार्क वॉर्नर, सिनेटर, अमेरिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक; अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत, मद्यधुंद चालकाचा हैदोस!

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT