Vladimir Putin
Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

युक्रेनच्या वाटेवर आणखी एक सोव्हिएत देश, पुतीन याचं वाढलं टेन्शन; भारतही त्या देशाचा मित्र

Manish Jadhav

Russia Armenia Tension: रशियाचा आणखी एक जुना मित्र युक्रेनचा मार्ग अवलंबणार आहे. या देशाने रशियाविरोधी समजल्या जाणाऱ्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व घेण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. या देशाचे नाव आर्मेनिया आहे. अर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री अरारत मिझायन यांनी सांगितले की, त्यांचा देश EU सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचा विचार करत आहे. आर्मेनियाचा पारंपारिक मित्र रशियाशी तणावपूर्ण संबंध आहेत. या कारणास्तव त्याला पाश्चिमात्य देशांशी जवळचे संबंध निर्माण करायचे आहेत. आर्मेनिया हा देखील भारताचा मित्र देश आहे. आर्मेनियाने भारताकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत. यामध्ये पिनाका मल्टिपल रॉकेट लाँचर, 155 मिमी हॉवित्झर तोफ, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली यांसारख्या घातक शस्त्रांचा समावेश आहे.

आर्मेनिया घेणार युरोपियन युनियनचे सदस्यत्व!

मिरझोयान यांनी तुर्कीच्या TRT वर्ल्ड टेलिव्हिजन स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आजकाल, आर्मेनियामध्ये अनेक नवीन संधींवर मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात आहे आणि जर मी असे म्हंटले की त्यात EU सदस्यत्व समाविष्ट आहे, तर ते गुपित राहणार नाही." भूमध्य सागरी किनाऱ्यावरील तुर्कस्तानच्या अंटाल्या शहरात राजनयिक मंचाच्या निमित्ताने ते बोलत होते. 2018 च्या क्रांतीमध्ये सत्तेवर आल्यापासून, आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी युरोप आणि युनायटेड स्टेट्स यांच्याशी आर्मेनियाचे संबंध दृढ केले आहेत, यावरुन त्याचा पारंपारिक मित्र देश रशिया वारंवार राग व्यक्त करत आहे.

आर्मेनियाचा रशियावर राग का आहे?

आर्मेनियाने वारंवार सांगितले आहे की, रशियासोबतची आपली युती युक्रेनमधील युद्धापर्यंत वाढलेली नाही. त्याचवेळी पीएम पशिन्यान यांनी रशियावर अनेक गंभीर आरोप केले. अलिकडच्या वर्षांत प्रतिस्पर्धी अझरबैजानपासून संरक्षण करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप देखील आर्मेनियाने रशियावर केला. अझरबैजानने 2020 मध्ये अर्मेनियाकडून नागोर्नो काराबाख जिंकले. नागोर्नो काराबाखची लोक मूलत: आर्मेनियन आहेत, परंतु अझरबैजानने त्यावर दावा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT