Temple Dainik Gomantak
ग्लोबल

Historical Discovery​: 'या' मुस्लीम देशात सापडलेले अतिशय प्राचीन मंदिर, ज्याने पाहिले तो थक्क झाला!

Turkish History: तुर्कस्तानच्या पूर्वेकडील वान जिल्ह्यातील एका प्राचीन किल्ल्याच्या उत्खननात पुरातत्वशास्त्रज्ञांना एक मंदिर सापडले आहे.

दैनिक गोमन्तक

Turkish Ancient Temples: ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचा शोध तुर्कीमध्ये लागला आहे. तुर्कस्तानच्या पूर्वेकडील वान जिल्ह्यातील एका प्राचीन किल्ल्याच्या उत्खननात पुरातत्वशास्त्रज्ञांना एक मंदिर सापडले आहे. या मंदिराचा संबंध राजा मिनुआशी सांगितला जात आहे. राज मिनुआचे दुसरे मंदिर देखील पुरातत्वशास्त्रज्ञांनी पूर्वी शोधले होते.

वास्तविक, तुर्कीमध्ये एका प्राचीन किल्ल्याचे उत्खनन सुरु आहे. हा किल्ला राजा मिनुआ याने इसवी सनपूर्व आठव्या शतकात बांधला होता. या किल्ल्याचे आधुनिक नाव 'Körzüt' आहे.

तुर्की सरकारच्या मान्यतेनंतर उत्खननाचे काम केले जात आहे

तुर्कस्तानच्या (Turkey) संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या परवानगीनंतर व्हॅन म्युझियमद्वारे या किल्ल्याचे उत्खनन केले जात आहे. उत्खननादरम्यान अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. उत्खननाचे हे काम व्हॅन युझुनकू यिल विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे प्राध्यापक सबाहत्तीन अर्दोन यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. या कामासाठी तुर्की सरकार निधीही देत ​​आहे. मात्र, हिवाळा पाहता किल्ल्यातील उत्खननाचे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे.

प्राचीन मंदिर कसे आहे?

पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधलेले हे मंदिर कॉर्बेलिंग तंत्राने बांधले गेले आहे. त्यात मातीचे तुकडे आणि धातूच्या वस्तूही सापडल्या आहेत.

अर्दोन म्हणाले की, 'आम्हाला वाटते की, हे मंदिर (Temple) राजा मिनुआने बांधले होते. आम्हाला मंदिराजवळ एक समाधी देखील सापडली आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात प्राचीन काळातील भांडीही सापडली आहेत. किल्ल्याच्या बाहेर एक स्मशानही सापडले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT