American Billionaire Bill Gates Dainik Gomantak
ग्लोबल

Bill Gates: बिल गेट्स यांचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ, तुम्हीही व्हाल थक्क; जाणून घ्या

American Billionaire Bill Gates: अमेरिकन अब्जाधीश बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते सीवरमध्ये उतरताना दिसत आहेत.

Manish Jadhav

American Billionaire Bill Gates: अमेरिकन अब्जाधीश बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते सीवरमध्ये उतरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अशा श्रीमंत व्यक्तीला सीवरमध्ये उतरण्याची का गरज पडली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

19 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड टॉयलेट डे साजरा करण्यात आला. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे. बिल गेट्स ब्रुसेल्समधील सीवर म्युझियमला ​​भेट देण्यासाठी सीवरमध्ये उतरले.

खुद्द अब्जाधीश गेट्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यात ते सीवरमध्ये उतरताना आणि ब्रुसेल्सच्या सांडपाणी व्यवस्थेबद्दल जाणून घेताना दिसले.

दरम्यान, व्हिडिओमध्ये बिल गेट्स सीवरमध्ये वैज्ञानिकांना भेटताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी शहरातील पाण्याच्या अपव्ययाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. शहराच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे सीवर आणि ट्रीटमेंट प्लांटचे हे 200 मैल लांबीचे जाळे असल्याची माहिती आहे.

गेट्स यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला यावर्षीच्या वर्ल्ड टॉयलेट डेनिमित्त ब्रुसेल्सच्या सांडपाण्याच्या व्यवस्थेबद्दल जाणून घ्यायचे होते. तसेच, जागतिक आरोग्यामध्ये सांडपाण्याची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला.'

कॉलराची साथ पसरली होती

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, 'मी ब्रुसेल्सच्या अंडरग्राउंड म्युझियममधून बरेच अनुभव घेतले. शहराच्या वाटर वेस्ट सिस्टमबद्दल जाणून घेतले. 1800 च्या दशकात शहराचे सांडपाणी सेने नदीत सोडले जात होते. त्यामुळे कॉलराची भीषण साथ पसरली होती. आज शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे सीवर आणि ट्रीटमेंट प्लांट्सचे 200 मैलांचे जाळे आहे.'

दुसरीकडे, बिल गेट्स (Bill Gates) स्वच्छतेबाबत जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2015 मध्ये, त्यांनी त्या कार्यक्रमात भाग घेतला होता, ज्यामध्ये 'सवेज स्लज'पासून पिण्यायोग्य पाणी बनवण्यासाठी प्लांट्स उभारण्यात आले होते. स्वच्छतेशी संबंधित अशा कार्यक्रमांमध्ये गेट्स अनेकवेळा दिसले आहेत आणि त्याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT