Eric Garcetti Dainik Gomantak
ग्लोबल

America: भारतातील राजदूत म्हणून लॉस एंजलिसच्या महापौरांची लागणार वर्णी

भारतात (India) अमेरिकेचे राजदूत म्हणून लॉस एंजलिसचे (Los Angeles) महापौर एरिक गार्सेट्टी (Eric Garcetti) यांच्या नावाची शिफारस केली आहे.

दैनिक गोमन्तक

वॉशिंग्टन: भारतात (India) अमेरिकेचे राजदूत म्हणून लॉस एंजलिसचे (Los Angeles) महापौर एरिक गार्सेट्टी (Eric Garcetti) यांच्या नावाची शिफारस केली आहे. याबद्दल गार्सेट्टी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे अभार मानत म्हटले, भारताचे राजदूत म्हणून माझ्या नावाची शिफारस केल्याबद्दल मला आनंद झाला आहे. मी ज्या प्रकारे महापौर असताना काम केले त्याच निश्चयाने राजदूत म्हणून काम करेन. जर 50 वर्षांच्या गार्सेट्टी यांचे सिनेटद्वारे मंजूर झाले तर ट्रम्प प्रशासनाच्या काळात भारतात नेमण्यात आलेले अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांची जागा घेतील.

शुक्रवारी दुपारी बायडन यांनी गार्सेटी यांच्या नावाची शिफारसीबद्दल म्हटले, "आज राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी माझ्या नावाचा विचार अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केला आहे. या नव्या भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल मी भाग्यशाली मानतो. त्याचबरोबर मला अभिमानही वाटतो. बायडन यांनी मोनॅकोचे राजदूत म्हणून डेनिस कॅम्पबेल बाऊर, बांग्लादेशचे पीटर डी. हास आणि चिलीसाठी बर्नाडेट एम. मीहान यांची नावे जाहीर केली आहेत.गार्सेटी पुढे म्हणाले, 'मला लॉस एंजेलिस शहर खूप आवडते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी दररोज तुमचा महापौर आहे, पूर्ण समर्पण आणि लक्ष देऊन या शहराचे नेतृत्व करत राहीन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT