Texas Mall Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Texas Mall Shooting: अमेरिकेत टेक्सास मॉलमध्ये बेछुट गोळीबार, अनेक जखमी

अमेरिकेतील टॅक्सास मॉलमध्ये घुसुन लोकांवर बेछुट गोळीबार केल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Texas Mall Shooting: अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे.  टेक्सास राज्यातील डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक हल्लेखाराने बेछुट गोळीबार केला. यामध्ये अनेक लोक जखमा झाले आहेत.त्यामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला.

पोलिसांनी हल्लेखोर ठार झाल्याची माहिती दिली आहे. पण, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली की पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

त्याचवेळी या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अनेकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. टेक्सासच्या मॉलमध्ये झाल्या गोळीबाराची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा होत आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी (7 मे) रोजी टेक्सास प्रांतातील डॅलस जवळील अॅलन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक पोहोचले आणि पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला. 

नंतर तेथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह हल्लेखोराचा असल्याचे सांगण्यात आले.ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हल्लेखोर मृतावस्थेत पडलेला दिसत आहे. त्याचे वय सुमारे 20 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT