US Firing: Dainik Gomantak
ग्लोबल

Gun Shooting in US: अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमध्ये बेछुट गोळीबार, 3 जणांचा मृत्यू

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. न्यू मेक्सिकोमधील फार्मिंग्टन येथे झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Gun Shooting in New Mexico US Kills 3: अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. न्यू मेक्सिकोमधील फार्मिंग्टन येथे झालेल्या बेछुट गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एपी वृत्तसंस्थेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारातील संशयित जागीच ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील न्यू मॅक्सिको शहरातील फार्मिंग्टन परिसरात अनेक लोक सकाळी मॉर्निक वॉकसाठी बाहेर पडले होते. त्यावेळी समोरून येत असलेल्या एका 18 वर्षीय हल्लेखोराने अचानक बेछूट गोळीबार सुरु केली.

आरोपीने केलेल्या गोळीबारात तीन लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह आठ जण जखमी झाले आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सशस्त्र जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला गोळ्या घालून घटनास्थळीच ठार केले आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात झालेल्या गोळीबारात दहा लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय न्यूयॉर्क तसेच न्यू जर्सी या शहरांमध्ये देखील गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

त्यानंतर आता न्यू मॅक्सिको शहरात झालेल्या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत सतत होत असलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT