America Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेचा मोठा दावा - अल कायदाचा वरिष्ठ दहशतवादी अबू हमजा सीरियात ड्रोन हल्ल्यात ठार

US Drone Strike: अमेरिकेने दावा आहे की त्यांनी ईशान्य सीरियामध्ये ड्रोन हल्ला केला आहे ज्यात अल कायदाचा दहशतवादी अबू हमजा मारला गेला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा एक वरिष्ठ दहशतवादी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. हा हल्ला झाला त्यावेळी ते दुचाकीवरून जात होते. ही घटना सोमवारी झाल्याची माहिती मिळत आहे. अबू हमजाह अल येमेनी असे ठार झालेल्या दहशतवाद्याच नाव आहे.

असे सांगण्यात आले आहे की अबू हमजा सीरियाच्या इदलिब (Idlib) भागात बाईकवर एकटाच कुठेतरी जात होता. त्याचवेळी अमेरिकेच्या (America) ड्रोनने त्याच्यावर हल्ला केला ज्यामध्ये दहशतवादी (Terrorist) ठार झाला. या हल्ल्यात एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही.

फ्रान्स दहशतवाद्यांविरोधात कठोर आहे

अमेरिकेशिवाय फ्रान्सही दहशतवाद्यांविरोधात कठोर आहे. दोन आठवड्यांपूर्वी फ्रान्सने नायजरमध्ये ड्रोन हल्ल्यात सुमारे 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दहशतवाद्यांनी साहेल भागात दहशत निर्माण केली होती. आफ्रिकेतील (Africa) साहेल प्रदेशात फ्रान्सच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांमधील एक नवीन धोरणात्मक यश असे फ्रेंच सैन्याने वर्णन केले आहे.

ISIS च्या दहशतवाद्याला अटक

या हल्ल्याच्या दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने उत्तर सीरिया भागातील अलेप्पो येथून आयएसआयएसच्या एका नेत्याला अटक केली होती. हानी अहमद अल कुर्दी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो बॉम्ब बनवण्याचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले. हनी अहमद हा सीरियातील इसिसच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक होता. संपूर्ण सीरियामध्ये (syria) दहशतवादी कारवाया करण्यासाठी हनी अहमद जबाबदार होता, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT