Amber Heard Twitter/ ANI
ग्लोबल

Johnny Depp-Amber Controversy: एम्बर हर्ड म्हणाली, 'तो माझ्या प्राइवेट पार्ट...'

पायरेट्स ऑफ कर्बियम फेम अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पत्नी एम्बर हर्ड यांच्यातील वादाने अनेक गुपिते न्यायालयासमोर उघड केली आहेत.

दैनिक गोमन्तक

पायरेट्स ऑफ कर्बियम फेम अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी एम्बर हर्ड यांच्यातील वादाने अनेक गुपिते न्यायालयासमोर उघड केली आहेत. जॉनीने एम्बरविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला असून, त्यावर न्यायालयात (Court) खटला सुरु आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत. आरोपांच्या या एपिसोडमध्ये, फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट डॉ डॉन ह्यूजेस (Dr. Don Hughes), जे आता एम्बरच्या बाजूने हजर आहेत, त्यांनी जॉनीविरोधात मोठे वक्तव्य केले आहे. (Amber Heard bursts into tears as she recounts her sexual assault by Johnny Depp)

दरम्यान, क्लिनिकल आणि फॉरेन्सिक साइकोलॉजिस्ट आणि डोमेस्ट‍िक वायलेंस एक्सपर्ट डॉ. ह्यूजेस यांनी जॉनीने केलेल्या एम्बरबरोबरच्या वर्तनावर सवाल उपस्थित केले आहे. इनसाइड रिपोर्टनुसार, डॉ. ह्युजेस यांनी एम्बरशी 29 तास चर्चा केली. दोघांच्या या संवादानंतर डॉ.ह्यूज यांनी एम्बरची बाजू घेत जॉनीवर गंभीर आरोप केले. डॉ. ह्यूजेस यांनी कोर्टात सांगितले की, 'जेव्हा जॉनी डेप मद्यधुंद होऊन घरी येत तेव्हा तिला मला मारहाण करायचा. त्यानंतर तो तिच्यावर जबरदस्तीने सेक्स करण्याचा प्रयत्न करायचा.' तसेच, त्याला राग आल्यानंतर तो एम्बरला ओरल सेक्ससाठी जबरदस्ती करायचा.

साइकोलॉजिस्ट ह्यूजेस यांनी जॉनी आणि एम्बरच्या एका घटनेचा देखील उल्लेख केला, जेव्हा त्याने कोकेन शोधण्यासाठी एम्बरबरोबर जबरदस्ती केली. डॉ ह्युजेस म्हणाले, जॉनी डेपने कोकेन शोधण्यासाठी हे घाणेरडे कृत्य केलं. एम्बरने गुप्तांगात कोकेन लपवले असावे, असा विचार करुन त्याने हे किळसवाणे कृत्य केले. ड्रग्जच्या नशेत जॉनी डेप या सगळ्या गोष्टी करायचा.

'शुध्दीत नसताना आणखी एक घटना घडली, जेव्हा जॉनीने एम्बरच्या प्रायव्हेट पार्टबरोबर जबरदस्ती केली.' डॉ. ह्युजेस यांनी आपले बोलणे संपवताना सांगितले की, जॉनी डेपचे हे वर्तन सुरुच होते.'

याशिवाय, डॉ. ह्युजेस यांनी न्यायालयाला सांगितले, 'माझ्या मते, एम्बर हर्डच्या इंटीमेट पार्टनर वॉयलेंसच्या अहवालावर आणि रेकॉर्ड केलेल्या नोंदीवर माझे पुनरावलोकन सुसंगत आहे. इंटीमेट पार्टनर वॉयलेंस, शारीरिक शोषण, साइकोलॉजिकल एग्रेसन, सेक्सुअल वॉयलेंस, कोएर्स‍िव कंट्रोल आणि सर्वायलेंस बिहेव‍यिर या द्वारे ही घटना परिभाषित केली जाऊ शकते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT