Myanmar Air Strike Dainik Gomantak
ग्लोबल

Myanmar Air Strike: भारतीय सीमेजवळ म्यानमारची Air Strike, मिझोराम दहशतीत; जाणून घ्या मोठे कारण

Myanmar Air Strike: म्यानमारच्या लष्कराने बुधवारी लष्करी कारवाई सुरु केली आणि भारतीय सीमेजवळ हवाई हल्ले केले.

Manish Jadhav

Myanmar Air Strike: म्यानमारच्या लष्कराने बुधवारी लष्करी कारवाई सुरु केली आणि भारतीय सीमेजवळ हवाई हल्ले केले. म्यानमार लष्कराच्या लढाऊ विमानाने हा हल्ला केला. पण हा हल्ला भारताला लागून असलेल्या म्यानमार सीमेच्या आत असलेल्या लक्ष्यावर करण्यात आला. मात्र या हल्ल्यामुळे मिझोराममधील लोक दहशतीखाली आहेत.

दरम्यान, म्यानमारचे (Myanmar) लष्कर आपल्याच हद्दीत गोळीबार का करत आहे, हा प्रश्न आहे. खरे तर फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारच्या लष्कराने देशातील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत सत्ता आपल्या हातात घेतली. तेव्हापासून म्यानमारमधील लोक लष्कराच्या विरोधात निदर्शने करत आहेत. विशेष म्हणजे, ते लोकशाहीची मागणी करत आहेत.

दुसरीकडे, म्यानमारचे लष्कर लोकशाही समर्थक बंडखोरांशी लढत आहे. रक्तरंजित संघर्षातून लोकशाही समर्थक शक्तींना चिरडण्यात लष्कर गुंतले आहे.

एका बंडखोर कमांडरने सांगितले की, बुधवारी लष्कराने म्यानमारच्या चिन राज्यातील कॅम्प व्हिक्टोरियावर बॉम्बहल्ला केला. कॅम्प व्हिक्टोरिया हे चिन नॅशनल आर्मी (CNA) चे मुख्यालय आहे.

CNA हा पीपल्स डिफेन्स फोर्स (PDF) च्या बॅनरखाली म्यानमारमध्ये लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी बंडखोर गटांसोबत लढणारा वांशिक सशस्त्र गट आहे.

कॅम्प सीमेपासून जवळ आहे

ज्या ठिकाणी हवाई हल्ला झाला त्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर सुरु होते. मिझोराम (Mizoram) सीमेपासून काही किमी अंतरावर हा कॅम्प आहे.

दुसर्‍या बंडखोराने सांगितले की, हल्ल्यानंतर दहशत पसरली, द गार्डियनने वृत्त दिले. काही विमाने म्यानमार आणि भारताच्या सीमेजवळ पोहोचली.

बंडखोर कमांडरच्या म्हणण्यानुसार, कॅम्प व्हिक्टोरियावर झालेल्या हवाई हल्ल्यात एका महिलेसह सात सैनिक ठार झाले आणि 20 हून अधिक जखमी झाले.

यापूर्वीही हल्ले झाले आहेत

याआधी, ऑक्टोबरमध्ये लष्कराने उत्तर म्यानमारमधील काचिन राज्यात एका कॉन्सर्टवर हवाई हल्ला केला होता. ज्यामध्ये 80 लोक मारले गेले, त्यापैकी बहुतेक नागरिक होते.

लष्कराने कॅम्प व्हिक्टोरिया येथे पहिल्यांदाच हवाई हल्ला केला आहे. सत्तापालट झाल्यापासून सुमारे 40 हजार लोक सीमा ओलांडून भारताच्या सीमेवर आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT