Pakistan Airlines Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Airlines: भारताकडून मार खालेल्या पाकड्यांवर ओढावली नामुष्की, शाहबाज सरकार विकणार पाकिस्तान एअरलाईन्स

Pakistan International Airlines: पाकिस्तान आता सरकारी विमान कंपनी पीआयए विकणार आहे. यासाठी सरकारने निविदा मागवण्यासही सुरुवात केली. पूर्वीची निविदा मागवण्याची अंतिम मुदत 3 जून होती, जी आता 19 जूनपर्यंत वाढवण्यात आली.

Manish Jadhav

बुडत्याचा पाय खोलात... ही मराठीतील म्हण पाकिस्तानच्या बाबतीत चपखल बसते. भारताकडून मार खालेल्या पाकड्यांवर पुन्हा एखदा मोठी नामुष्की ओढावली आहे. आर्थिक समस्येचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने मोठी कंपनी विक्रीस काढली. पाकिस्तान आता सरकारी विमान कंपनी पीआयए विकणार आहे. यासाठी सरकारने निविदा मागवण्यासही सुरुवात केली. पूर्वीची निविदा मागवण्याची अंतिम मुदत 3 जून होती, जी आता 19 जूनपर्यंत वाढवण्यात आली.

पाकिस्तानने (Pakistan) संभाव्य गुंतवणूकदारांना पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीआयएसीएल) च्या खाजगीकरणासाठी त्यांच्या बोली तयार करण्यासाठी अधिक वेळ दिला आहे, ज्यामुळे ईओआय सादर करण्याची अंतिम मुदत 19 जूनपर्यंत वाढली.

खाजगीकरण आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द न्यूजला दिलेल्या मुदतवाढीची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, अधिग्रहणासाठीच्या इतर सर्व अटी आणि शर्ती बदललेल्या नाहीत. सरकार पीआयएसीएलमध्ये संपूर्ण व्यवस्थापन नियंत्रणासह 51 टक्क्यांवरुन 100 टक्के पर्यंत नियंत्रणात्मक हिस्सा विकू शकते.

मुदतवाढ देण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, हे ईद उल अधामुळे आहे. सरकार वित्तीय तूट कमी करण्यासाठी आणि् परदेशी गुंतवणूक (Investment) आकर्षित करण्यासाठी तोट्यात चाललेल्या राष्ट्रीय कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या योजनांवर जोर देत आहे. ही प्रक्रिया विस्तारित निधी सुविधा (EFF) अंतर्गत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत मान्य केलेल्या सुधारणांचा एक भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT