Dogs Longest Journey Dainik Gomantak
ग्लोबल

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

African Wild Dogs 4000 km Journey Study: आफ्रिकेतील जंगलांमध्ये राहणाऱ्या रानकुत्र्यांनी वंश वाढवण्यासाठी आणि मादीचा शोध घेण्यासाठी तब्बल 4 हजार 162 किलोमीटरचा अद्भूत आणि थरारक प्रवास केल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले.

Manish Jadhav

African Wild Dogs 4000 km Journey Study: आफ्रिकेतील जंगलांमध्ये राहणाऱ्या रानकुत्र्यांनी वंश वाढवण्यासाठी आणि मादीचा शोध घेण्यासाठी तब्बल 4 हजार 162 किलोमीटरचा अद्भूत आणि थरारक प्रवास केल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले. तीन भावांच्या एका टोळक्याने अवघ्या आठ महिन्यांत 4126 किलोमीटरचे अंतर पार केले असून, आफ्रिकेतील कोणत्याही सस्तन प्राण्याने पार केलेले हे आजवरचे सर्वात लांब अंतर नोंदवले गेले. ‘इकोलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात झाम्बियातील मानवी वस्त्या, नद्या आणि डोंगरदऱ्यांमधून प्रवास करणाऱ्या रानकुत्र्यांच्या टोळ्यांचा ट्रॅकिंग डेटा सादर करण्यात आला.

संशोधनानुसार, रानकुत्रे हे नेहमी टोळीने राहतात, जिथे केवळ मुख्य नर-मादीची जोडीच प्रजननाचा अधिकार ठेवते. परिणामी, टोळीतील इतर तरुण कुत्र्यांना, विशेषतः 2 ते 3 वर्षे वयाच्या सदस्यांना नवीन साथीदार शोधण्यासाठी आणि स्वतःचे नवीन क्षेत्र प्रस्थापित करण्यासाठी टोळी सोडून भटकावे लागते. या प्रवासात वेगवेगळ्या दिशांना गेलेल्या चार टोळ्यांनी एकूण 9863 किलोमीटरचे अंतर कापले. मोंटाना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक स्कॉट क्रील यांनी आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील रानकुत्र्यांची ही मोठी लोकसंख्या (Population) आजही एकमेकांशी जोडलेली असून ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

मात्र, या ऐतिहासिक प्रवासासाठी प्राण्यांना अत्यंत मोठी आणि भयानक किंमत मोजावी लागत आहे. 'EWD-1355' नावाच्या एका मादी रानकुत्र्याने झाम्बिया ते मोझांबिक असा 2300 किलोमीटरचा खडतर प्रवास केला होता, परंतु जून 2022 मध्ये एका जाळ्यात अडकून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाम्बियन कार्निव्होर प्रोग्रामने जीपीएस कॉलरचा वापर करुन या प्राण्यांचा माग काढला.

रानकुत्र्यांच्या या टोळ्या मोठ्या नद्या, महामार्ग, ग्रेट रिफ्ट व्हॅलीचे खडे डोंगर आणि मानवी शहरे पार करत सातत्याने पुढे जात आहेत. प्राण्यांमधील हा नैसर्गिक संपर्क आणि मार्ग अजूनही जिवंत आहेत हे या संशोधनातून सिद्ध झाले असून, आता हे नैसर्गिक कॉरिडोर सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT