Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानचा पाकिस्तानसोबतचा व्यापार झाला कमी

तालिबानच्या (Taliban) राजवटीत या वर्षी दोन्ही देशांमधील व्यापार 26 टक्क्यांनी कमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीत सर्वाधिक आनंदी असलेल्या पाकिस्तानचा शेजारील देशासोबतचा व्यापार कमी होत आहे. एका न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानच्या (Taliban) राजवटीत या वर्षी दोन्ही देशांमधील व्यापार 26 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसोबतचा व्यापार वाढला आहे. (Taliban Latest News In Marathi)

अफगाणिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इन्व्हेस्टमेंट (ACCI) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षात आतापर्यंत अफगाणिस्तानने या तीन देशांना 33 दशलक्षची निर्यात केली आहे, तर 2 बिलियनची आयात केली आहे. ACCI ने पाकिस्तानसोबत आयात-निर्यात डेटा जारी केला नाही, परंतु दोन्ही देशांमधील व्यापारात यावर्षी लक्षणीय घट झाल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या बँकांचे कडक नियम आणि आयात-निर्यातीसाठी वाहतुकीची समस्या ही त्यामागची कारणे आहेत.

एसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद युनूस मोहमंद म्हणाले, "या वर्षी मध्य आशियामधून आमची आयात दोन अब्ज डॉलर्स होती." दरम्यान, अफगाणिस्तान पाकिस्तान जॉइंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापार 26 टक्क्यांनी कमी झाला आहे.

चेंबरचे प्रमुख नकीबुल्ला साफी म्हणाले, 'यामागे अनेक कारणे आहेत. प्रथम, बंदरावर मालाची वाहतूक करण्यात अडचण, आणि दुसरे, पाकिस्तानच्या बँकिंग प्रणालीद्वारे व्यापारावरील निर्बंधांची मालिका, ज्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात कमी झाली. त्याच वेळी, अर्थ मंत्रालयाने सांगितले की, तालिबानने सत्ता घेतल्याने, मध्य आशिया आणि दक्षिण आशियामधील व्यापार आणि संक्रमणामुळे देशाच्या उत्तरेकडील सीमाशुल्क महसूल वाढला. ACCI पुढे म्हणाले की, यावर्षी अफगाणिस्तानच्या आयातीमध्ये झालेली घट हे देशातील बेरोजगारी, गरिबी आणि आर्थिक अडचणींमुळे होते, ज्यामुळे बाजारातील मागणीत मोठी घट झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT