Luxurious mansion Dainik Gomantak
ग्लोबल

माजी उपराष्ट्रपतींचा आलिशान 'काबूल वाडा' आता तालिबानच्या हातात

माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम (Abdul Rashid Dostum) यांच्या आलिशान हवेलीवर कब्जा केला आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबानी (Taliban) लढाख्यांनी काबूलमधील (Kabul) त्यांचा सर्वात कट्टर शत्रू आणि फरार माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम (Abdul Rashid Dostum) यांच्या आलिशान हवेलीवर (Luxurious mansion) कब्जा केला आहे. या हवेलीची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो दर्शवतात की, तालिबानी लढाखे हवेलीच्या अंतहीन कॉरिडॉरमध्ये आराम करत आहेत. काबूल ताब्यात घेतल्यानंतर, नवीन राजवटीतील सर्वात शक्तिशाली कमांडरांपैकी एक, कारी सलाहुद्दीन अयूबीने ही हवेली काबीज केली. त्याने आपल्या संरक्षणाखाली 15 ऑगस्ट रोजी हवेलीमध्ये 150 लोकांची कंपनी स्थापन केली आहे. बहुतेक सामान्य अफगाणांसाठी (Ordinary Afghans) हे अकल्पनीय आहे.

हॉलमध्ये प्रचंड मोठे काचेचे झुंबर लटकलेले आहे, शय्यागृहात आरामदायी सोफे आहेत. फिरोजा टाइल्सपासून बनलेले एक इनडोअर स्विमिंग पूल देखील आहे. यात सौना, तुर्की स्टीम बाथ आणि उत्तम व्यायामशाळा देखील आहे. तालिबानी लढाख्यांसाठी हा एक अकल्पनीय अनुभव असून जो वर्षानुवर्षे बंडखोरीशी लढत आहेत.

त्याच वेळी, "इस्लाम कधीच आम्हाला आरामदायी जीवन देऊ इच्छित नाही. विश्रांती फक्त स्वर्गात मिळू शकते," अयुबीने एएफपीला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jio Platforms IPO: जिओच्या आयपीओचा नवा विक्रम! अवघ्या 100 मिनिटांत पूर्ण सबस्क्रिप्शन; पहिल्याच दिवशी 3 पट मागणी

Murder Case: अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई नाही? तरुणाच्या खुनाने काणकोण हादरले; 300 ग्रामस्थांचा घेराव

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT