Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये जाणवले 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार पहाटे 2 च्या सुमारास 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची खोली जमिनीखाली 267 किलोमीटर होती. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

यापूर्वी इंडोनेशियातील पश्चिम जावा भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. येथे त्याची तीव्रता 6.1 मोजली गेली. या भूकंपामुळे एक जण जखमी झाला असून चार घरांची पडझड झाली आहे. त्याचवेळी भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

नोव्हेंबरमध्ये पश्चिम जावामधील सियांजूर येथे 5.6 तीव्रतेचा भूकंप झाला ज्यामध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या भूकंपामुळे सुमारे 700 लोक जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे यातील बहुतांश लोकांची हाडे मोडली होती. बीएनपीबीचे प्रमुख सुहार्यंतो यांनी स्थानिक वृत्तवाहिनी मेट्रो टीव्हीला सांगितले की, शनिवारी भूकंपाच्या केंद्राजवळील इतर ठिकाणी अधिकारी अजूनही तपास करत आहेत.

बीएनपीबीचे प्रमुख सुहार्यंतो यांनीही सांगितले की, यावेळी भूकंपामुळे सियांजूरमध्ये जेवढे नुकसान झाले तेवढे नुकसान झाले नाही. सुरुवातीला त्याची 118 किमी खोलीसह 6.4 तीव्रता नोंदवली गेली आणि नंतर 109 किमी खोलीवर नोंद झाली. भूकंपाच्या एका तासानंतर, BMKG ने 107 किमी खोलीवर 2.9 तीव्रतेचा छोटा भूकंप नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT