Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

Afghan स्वातंत्र्य दिनीच तालिबान्यांनी नागरिकांवर केला अमानुष गोळीबार

19 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन (Independence Day Afghanistan) साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (Afghanistan) असदाबाद (Asadabad) शहरात देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रॅली काढणाऱ्या लोकांवर तालिबानी बंडखोरांनी (Taliban) आपल्याच नागरिकांवर गोळीबार केला, ज्यात अनेक लोक मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. यासह, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, तालिबानने आपली प्रतिमा सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांचा रक्तपाताशी संबंध कायम आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काही अफगाणी नागरिक रॅली काढत होते. दरम्यान, तालिबान बंडखोरांनी देशाचा ध्वज फडकवणाऱ्या काही नागरिकांवर गोळीबार केला, त्यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. कुन्नर प्रांताची राजधानीचे प्रत्यक्षदर्शी मोहम्मद सलीम म्हणाले की, हे स्पष्ट नाही गोळीबार किंवा चेंगराचेंगरीत नागरिकांचा मृत्यू झाला ते.

सध्या तालिबानकडून यावर कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. 19 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन (Independence Day Afghanistan) साजरा केला जातो. यापूर्वी बुधवारी असे दावा करण्यात आले होते की तालिबान लढाऊंनी काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवरही हल्ला केला आहे. विमानतळावरून जमावाला परत पाठवण्यासाठी तालिबान लढाऊंनी गोळीबारही केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

SCROLL FOR NEXT