Kidnapping Symbolic Image Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: अफगानिस्तानच्या राजदूताच्या मुलीचे 'अपहरण'

पाकिस्तानमध्ये (Pakistan) झालेल्या या भयंकर कृत्यामुळे मानवतेला काळीमा फासल्याचे बोलले जाते आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानचे (Afghanistan) राजदूत नजीबुल्ला अलिखील (Najibullah Alikhil) यांच्या मुलीचे पाकिस्तानमध्ये (Pakistan) अपहरण झाल्याच्या वृत्तामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील अफगाण राजदूताच्या मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अनैतिक घटनेने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. (Afghan ambassador's daughter abducted in Pakistan)

पाकिस्तानमध्ये झालेल्या या भयंकर कृत्यामुळे मानवतेला काळीमा फासल्याचे बोलले जाते आहे. पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या राजदूत नजीबुल्ला अलिखील यांच्या मुलीचे केवळ अपहरणच केले नाही तर छळ देखील करण्यात आला. अफगाणी राजपूतच्या मुलीवर अत्याचार करण्याचे हे संपूर्ण प्रकरण पाकिस्तान तालिबानी हिंसाचाराचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानी माध्यमांनी नवीन भूमिका दिली आहे अफगाण राजदूताची मुलगी सोडण्यात आल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. पण यादरम्यान अशी बातमी आहेत की सुटका होण्यापूर्वी अफगाण राजदूताची मुलगी सिलसिला अलीखिल हिचा अत्याचार झाला होता.

मुलीचे अपहरण करण्याचे संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. पाकिस्तानमधील अफगाण राजदूत नजीबुल्ला अलीखिल यांच्या मुलीचे आज (शनिवारी) अपहरण झाले होते. या प्रकरणात तालिबानीच जबाबदार असल्याचे म्हटले जाते आहे. अपहरण झालेली मुलगी सिलसिला अलीखील हिच्यावर अत्याचार झाल्याची देखील माहिती मिळते आहे.

दरम्यान, नंतर राजदूताच्या मुलीच्या सुटकेची बातमी पाकिस्तानी माध्यमांतून समोर आली आणि ही बाब उघडकीस आली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असुन, यामुळे दोन्ही देशांमध्ये वाढला आहे.

पाकिस्तानमधील या गंभीर घटनेचा जोरदार निषेध करत अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानमध्ये तैनात असलेल्या अफगाणिस्तानच्या मुत्सद्दी मोहिमेची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे.

अफगाणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'आम्ही या गुन्ह्याचा निषेध करतो आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत पाकिस्तानी मिशनमध्ये तैनात असलेले मुत्सद्दी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आम्ही मागणी करतो. आम्ही हे प्रकरण पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयासमोर ठेवू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT