Ukrainian soldiers Dainik Gomantak
ग्लोबल

रशियन प्लॅन्सवर युक्रेनियन सैनिकाने फेरले पाणी, लष्कर म्हणतयं 'हीरो'

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये (Ukraine) भयंकर विध्वंस घडवून आणला आहे.

दैनिक गोमन्तक

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या युद्धाच्या काळात युक्रेन (Ukraine) आपल्या एका सैनिकाचे कौतुक करत आहे. रशियन रणगाड्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी या युक्रेनच्या सैनिकाने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही, असं युक्रेनियन सैन्याकडून सांगण्यात आले आहे. (A Ukrainian Soldier Blew Himself Up While Intercepting Russian Troops)

वास्तविक, रशियन सैन्य हेनिचेस्क पुलाच्या दिशेने जात होते. परंतु हा युक्रेनियन सैनिक पुलावर तैनात होता. जेव्हा याला रशियन सैन्याला रोखण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता, तेव्हा त्याने हा पूल स्वतःच उडवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये वेळ कमी होता. हे पाहून, त्याने स्वत:ला उडवून पूल नष्ट केला. त्यामुळे हेनिचेस्क ब्रिजवरुन जाण्याचे रशियन सैन्याचे मनसुबे फस्त झाले.

तसेच, रशियन सैन्य त्याच्या दिशेने येत त्याने पाहीले. त्यानंतर सावधपणे पवित्रा घेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी त्याने स्वत:ला पूलासह उडवून दिले. द सनच्या वृत्तानुसार, विटाली स्काकुन वोलोडिमायरोविचच्या सहकाऱ्यांनी शत्रूला रोखण्याच्या त्याच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

शिवाय, राजधानी कीववर क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान शुक्रवारी युक्रेनियन नागरिकांनी पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाकियामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. या भागात मोठ्या संख्येने लोक सीमेवर तासनतास थांबलेले दिसत आहेत. गुरुवारी युक्रेनमधून किमान 29,000 लोक पोलंडमध्ये दाखल झाले. मात्र, यापैकी किती शरणार्थी आहेत, आणि किती मायदेशी पुन्हा परतणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फोन चोरीपासून वाचवण्याचा तरुणाचा 'Z+ सिक्युरिटी' फॉर्म्युला, ट्रेनमधील अतरंगी व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावाला कशाचीच भीती नाही..."

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Suicide Attack In Pakistan: पाकिस्तानी सैन्याच्या चेकपोस्टला पुन्हा बनवले निशाणा! आत्मघाती हल्ल्यात 20 सैनिक मारल्याचा दावा, धडकी भरणारा VIDEO व्हायरल

IND vs AUS Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहता येणार? काय आहे सामन्याची वेळ? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT