America Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

America Crime News: धक्कादायक! ट्रेन अपघातात मृत व्यक्तीचा तुटलेला पाय घेऊन गेला माथेफिरु, अन्...

America Crime: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिथे एकच खळबळ उडाली.

Manish Jadhav

America Crime News:

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिथे एकच खळबळ उडाली. एक व्यक्ती कापलेला पाय घेऊन फिरत होता. रिपोर्टनुसार, अनेकांनी त्या व्यक्तीला पाय कापताना पाहिले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील एका रेल्वे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचा कापलेला पाय घेऊन माथेफिरु फिरत असताना पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो मृत व्यक्तीचा पाय घेऊन फिरत आहे. तो त्याचा काही भाग खातही आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकर्सफील्डच्या वायव्येस सुमारे 25 मैलांवर असलेल्या वास्को येथील स्थानिक अमट्रॅक स्टेशनवर ही घटना घडली. या घटनेचा एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती फूटपाथची पाहणी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो मृत व्यक्तीच्या पायाचा पहिल्यांदा वास घेतो आणि नंतर खायला सुरुवात करतो. आजूबाजूचे लोक बनवत असलेल्या व्हिडिओंबाबत तो बेफिकीर असल्याचे दिसतो.

दुसरीकडे, पोलिस त्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. केर्न काउंटी शेरीफ कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपी रेसेन्डो टेलेझ, वय वर्ष 27 अशी त्याची ओळख पटली आहे. घटनास्थळी पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सकाळी स्टेशनवर रेल्वेच्या धडकेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला, ज्यामध्ये त्याचा पाय कापला गेला. अधिकारी सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT