NeoCoV Dainik Gomantak
ग्लोबल

'NeoCoV' व्हेरिएंट ठरणार मृत्यूचं कारण ! वुहानच्या शास्त्रज्ञांचा दावा

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' (NeoCoV) आढळला आहे.

दैनिक गोमन्तक

चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी आता नवीन कोरोनाच्या 'NeoCoV' या व्हेरिएंटबद्दल भीतीदायक बातमी दिली आहे. 2019 मध्ये वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार जगभर झाला होता. आता तेथीलच शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना विषाणूचा (Corona Virus) एक नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' (NeoCoV) आढळला आहे. त्याचा संसर्ग आणि मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे संक्रमित झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो. (A NeoCoV Variant Of The Corona Virus Has Been Found In South Africa)

दरम्यान, वुहानच्या (Wuhan) वैज्ञानिकांचा हा दावा स्पुतनिक या रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग आधीच भीतीच्या सावटाखाली आहे. त्याचे ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंट अधिक घातक ठरत आहेत. अशा स्थितीत 'निओकोव्ह' चिंता वाढवू शकतो. निओकोव्ह विषाणू नवीन नाही, असेही अहवालात म्हटले आहे. हा MERS-CoV विषाणू MERS-CoV विषाणूशी संबंधित आहे. 2012 मध्ये ते मध्य पूर्वेकडील देशांमध्ये सापडला आहे. हे SARS Cove 2 सारखेच आहे, जिथून कोरोना विषाणू मानवांमध्ये पसरला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या वटवाघळांमध्ये आढळला

दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये NeoCov विषाणू आढळून आला आहे, तो सध्या फक्त याच पक्ष्यांमध्ये पसरतो. परंतु 'BioRxiv' वेबसाइटवर प्रीप्रिंट म्हणून प्रकाशित झालेल्या अहवालात दावा केला आहे की, तो आणि त्याचे जवळचे स्वरुप PDF-2180-Cov (PDF-2180-) CoV) मानवांना देखील संक्रमित करु शकतो. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सचे शास्त्रज्ञ म्हणतात की, NeoCoV च्या फक्त एका उत्परिवर्तनाने, ते मानवी पेशींमध्ये पसरण्यास सुरवात करेल. चिनी संशोधकांच्या मते, NeoCoV मध्ये उच्च संसर्ग दर गाठण्याची क्षमता आहे. आणि प्रत्येक तीन संक्रमितांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT